HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

आपल्याला शिवसेना प्रमुखांना १०० आमदारांची तोफरुपी सलामी द्यायची आहे !

मुंबई | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यांना अब की बार १०० पार १०० आमदरांची तोफ रुपी सलामी द्यायची आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यातील उपस्थितीत शिवसैनिकांना सांगितले. राऊत पुढे म्हणाले की, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना तुम्ही १२४ जागावर निवडणूक लढविण्यास तयार कसे झालात असे विचारले, त्यावर ठाकरे म्हणाले की, आकड्यावरून वाकड्यात जायाचे नाही, १२४ या जागा आहेत हे आपले १२४ गड आहेत, असे राऊत म्हणाले.

“पुढेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बाजुला शिवेसनेचा मुख्यमंत्री बसलेला असेल,” असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. “ चांद्रयांन २ची तांत्रिक कारणाने व्यवस्थतीत लॅडिंग झाले नाही, मात्र, आमचे आदित्य नावाचे सुर्ययान महाराष्ट्रात फिरून २४ तारीखला मंत्रालयाच्या ६ व्या मजलयावर उतरल्याशिवाय राहणार नाही,’ असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.

मित्र पक्षांनी आमच्या व्यासपीठावर यावे

“महादेव राव जानकर आणि रामदास आठवले यांचे काल वक्तव्य सुद्धा ऐकण्यासारखे होते. आमचे महायुतीतील सहकारी आहेत आमचे ते दोस्त आहेत. एक समाजाचे प्रतिनिधीत्व करत आहेत त्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते, त्यांच्या ह्रयात वेदना होते, फसत वाटत असेल तर आमच्या व्यासपीठावर यावे,” असे म्हणत संजय राऊत यांना शिवसेनेची ऑफर दिली. अजित पवारांसारखे कोणी रडते का, नेता कधी रडतो का, ईडीच्या भीतीने त्यांना रडू कोसळले. रडणारे नेते निवडणुकीत लढायला उभे आहेत की, गुडघ्यावर बसले आहेत

 

 

 

 

Related posts

इम्रान खानच्या गुगलीवर सुषमा स्वराज यांची बॅटिंग

News Desk

राफेल डीलची ऑडिओ क्लिप खरी | राहुल गांधी

News Desk

२१ दिवसांचे ‘लॉक डाऊन’ आजपासून १५ दिवसापूर्वीच जाहीर व्हायला हवे, सामनातून सवाल

rasika shinde