HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

भाजपला सत्तस्थापनेपासून रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार ?

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे उलटून गेले असूनही अद्याप सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात संघर्ष सुरू आहे. राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. यानंतर राज्यातील राजकारणात घडामोडींना वेळ आला आहे. भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळ रंगल्या आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (१० नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले होते.

या दोन्ही पक्षातील नेत्यांचे राज्यासाठी योगदान असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक केले. राऊत पुढे म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमचे विचार वेगळे असले म्हणून आम्ही एकमेकांचे शत्रू नाही आहोत. आमचे राजकीय  मतभेद आहेत. ते कोणाचे नसतात. आम्ही अनेकदा भाजपच्या विरोधातही मुद्दे मांडले. त्यामुळे ते आमचे शत्रू आहेत असे नाही अशा शब्दांत राऊतांनी म्हटले. बेळगाव-कारवार सीमा प्रश्नावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सेनेप्रमाणे आक्रमक भूमिका घेतात, असे म्हणत राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादी कौतुक केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहे. शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयाबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे विचारणा केली असता. अद्याप पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज संध्याकाळी दिल्लीहून दोन निरीक्षक येत आहेत, ते सगळ्या राज्यातील आमदारांशी बोलतील, नेत्यांशी बोलतील आणि दिल्लीत सोनिया गांधींना अहवाल देतील, त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होईल, असे या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.

 

 

Related posts

राणे 27 ऑगस्टला भाजपात प्रवेश करणार

News Desk

शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

News Desk

संजय राऊतांसह रामदास कदम राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना

News Desk