HW News Marathi
महाराष्ट्र

…अखेर निवासी डॉक्टरांचा संप मागे

 

मुंबई – राज्यभरातील रूग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 1100 सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणा-या मारहाणी विरोधात संप पुकारलेल्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. आज रात्री (बुधवार) आठ वाजल्यापासून कामावर रुजू होणार आहेत. त्यामुळे रूग्णसेवेवर होणारा परिणाम काहीप्रमाणात कमी होणार आहे.

राज्यभरातील रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 1100 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतील, असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आल्यानंतर निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. दरम्यान, रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी असणारे सुरक्षा रक्षक हे 21 ते 24 वयोगटातील असणार आहेत. याआधी दुपारी राज्य सरकारकडून आज रात्री आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांच्या पगार कापला जाईल, असा इशारा निवासी डॉक्टरांना राज्य सरकारकडून देण्यात आला होता.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानेही निवासी डॉक्टरांना मंगळवारी फैलावर घेतले होते. स्वत:च्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सामान्यांना वेठीस धरू नका. अन्य डॉक्टर काम करत आहेत, तुम्हालाच कशी भीती वाटते? कामावर रुजू व्हा अन्यथा नोकरी सोडा, अशा शब्दांत त्यांना खडसावले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हुंडा प्रथेविरोधात उपाययोजनेची गरज – संभाजी ब्रिगेड

News Desk

पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले !

News Desk

बेछूट आरोपांपेक्षा आत्मचिंतन करा, अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला  

News Desk