HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र मुंबई

अमिताभ -अभिषेकनंतर ऐश्वर्या आणि आराध्या बच्चनलाही कोरोना,बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात !

मुंबई | बाॅलिवूडमधील बच्चन कुटुंबाच्या चिंतेत भर पडली आहे . अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यापाठोपाठ आता  अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे अभिषेक-ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या बच्चन हिलासुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदाही यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.यासंदर्भातील अधिकृत माहिती राज्यातले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली आहे. मात्र आता बच्चन कुटुंबातील ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याने चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण पसरलं आहे.अमिताभ यांचे राहते घर जलसा हे कटेंमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि तो परिसर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सॅनिटाईझ केला आहे.

 

Related posts

देशाच्या प्रत्येकाचा आम्हाला अभिमान-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

News Desk

एकनाथ खडसे आणि नारायण राणे यांची केंद्रात वर्णी

News Desk

आधी शौचालय मग लग्न; मुलीने ठणकावले

News Desk