HW Marathi
महाराष्ट्र

आता वाहनांचे आरसी बुक पुन्हा ‘स्मार्ट’

सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून वाहनांचे आरसी बुक छापील स्वरूपात देण्यात येत होते. हे कागदी आरसी बुक सांभाळणे वाहन चालकांसाठी त्रासाचे होते. मात्र आता एक सप्टेंबरपासून पुन्हा स्मार्ट आरसी बुक वितरण करण्याची व्यवस्था परिवहन विभागाकडून केली जाणार आहे. विशेष म्हणजे या वेळेस या स्मार्ट कार्डची किंमतही कमी करण्यात आली आहे.

परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत आरटीओंची पुण्यात बैठक झाली. या बैठकीत आरटीओ कार्यालयात वाहन परवाना वितरित करण्यात येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. वाहनांचे आरसी बुक स्मार्ट कार्ड स्वरूपात देण्याचा कंपनीबरोबरचा करार संपला होता. त्यामुळे कागदी स्वरूपात आरसी बुक देण्यात येत होते. मात्र पूर्वीचा ठेका असलेल्या कंपनीबरोबर आता नव्याने करार करून एक सप्टेंबरपासून आरसी बुक स्मार्ट स्वरूपात उपलब्ध केले जाईल, असे आयुक्त गेडाम यांनी सांगितले. मात्र यावेळेस स्मार्ट कार्डची किंमत कमी करण्यात आली आहे. पूर्वी वाहनधारकांकडून स्मार्ट कार्ड आरसीसाठी ३५०रुपये फी आकारली जात होती. आता मात्र दोनशे रुपयांत स्मार्ट आरसी दिले जाईल. यात ठेकेदाराला ५४.७२ रु. तर उर्वरित रक्कम शासनाला जमा होईल

Related posts

दलित संघटनांच्या भारत बंदला हिंसक वळण

News Desk

दानवे विरोधात शिवसैनिकांनी केले ” जोडे मारो आंदोलन “

News Desk

रिलायन्सकडून मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीत ५ कोटींची मदत

rasika shinde