HW News Marathi
महाराष्ट्र

उपसंचालक गोस्वामी साहेब हे वागणं बरं नव्हं…

  • नांदेडमध्ये मुख्याध्यापकांच्या बैठकीत महिला मुख्याध्यापिकेला उद्देशून वापरले अपशब्द

उत्तम बाबळे

नांदेड – नांदेडचे शिक्षण उपसंचालक कैलास गोस्वामी यांनी मुख्याध्यपकांच्या बैठकीत एका महिला मुख्याध्यापिकेशी अर्वाच्च भाषेत संभाषण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बैठकीला उपस्थित इतर मुख्याध्यपकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागकडून जिल्हानिहाय विद्यार्थी कल चाचणीच्या अहवालासंदर्भात कार्यशाळा घेतल्या जात आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील मुख्याद्यापकांसाठी दि.२० फेब्रुवारी २०१७ रोजी कुसुम सभागृहात नांदेड येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी व आढावा घेण्यासाठी शिक्षण विभागाचे उपसंचालक कैलास गोस्वामी यांची मुख्य उपस्थिती होती. आयोजित कार्यशाळेच्या प्रारंभीच मुख्याध्यापकांचा शाळा निहाय आढावा घेतांना शिक्षण उपसंचालक गोस्वामी यांनी आपल्या समोरील प्रस्तुत यादीतील एका पाठोपाठ दुस-यास उठविले व आढावा वाचनासाठी उठलेल्या मुख्याध्यापकांना अहवाल वाचवून दाखवतांना मध्येच अडवत ” तुम्ही किती जाड आहात ” , ” तुम्ही काही वेगळेच दिसता ! ” असे म्हणत अर्वाच्च भाषेचा ही वापर केला.

उपसंचालक गोस्वामी महोदय एवढ्यावरच थांबले नाहीत तर अन्य एका शाळेच्या स्वत:पेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्या मुख्याध्यापकाशी जोरात, असभ्य बोलण्याचा आणि एका महिला मुख्याद्यापिकेला अवमानकारक बोलण्याचा ही प्रकार केला. यावेळी अनेक महिला मुख्याध्यापिका देखील उपस्थित होत्या. त्यामुळे या महिला मुख्याध्यापिकेला गहिवरुन आले.

शिक्षण उपसंचालक गोस्वामी यांची ही वाचाळ वृत्ती पाहून उपस्थित सर्व मुख्याध्यापक अव्वाक झाले आणि त्यांनी गोस्वामी यांच्या या वर्तनाचा जाहीर निषेध केला आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील उच्च पदस्थ अधिकारी हे मुख्याध्यापकांशी अशा असभ्य व अर्वाच्च भाषेचा वापर करुन या क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार करतात. ही बाब मनाला वेदनादायी असल्याने गोस्वामी यांची वरिष्ठांनी चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी मुख्याध्यापकांनी केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MaharashtraResult2019 : पंतप्रधान मोदींच्या सभेनंतरही ‘या’ भाजपच्या दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव

News Desk

…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील! – रामदास आठवले

News Desk

शहीद मेजर शशीधरन नायर यांच्‍या पार्थिवावर लष्‍करी इतमामात अंत्यसंस्कार

News Desk