HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसतर्फे महापौर पदासाठी विठ्ठल लोकरे आणि उपमहापौर पदासाठी विनिफ्रेड डिसूझा – संजय निरुपम

भाजपाने महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेणे म्हणजे शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला समर्थन देणे आणि मुंबईकरांना धोका देणे – संजय निरुपम..

मुंबई : भाजपाने महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे तरी हि काँग्रेस मात्र हि निवडणूक लढविणार आहे. काँग्रेसतर्फे महापौर पदासाठी विठ्ठल लोकरे आणि उपमहापौर पदासाठी विनिफ्रेड डिसूझा यांना उमेदवारी दिलेली आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

ते पुढे म्हणाले कि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवेसेना व भाजपा एकमेकांविरुद्ध लढले, एकमेकांवर निवडणुकीत आरोप प्रत्यारोप केले. परंतु आत्ता भाजपाने महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेणे म्हणजे शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला समर्थन देणे, पाठिंबा देणे आणि मुंबईकरांना धोका देणे आहे. हीच काय भाजप्पाची पारदर्शकता आहे, असा माझा सवाल आहे. भाजपा नेहमी म्हणत आली कि शिवसेना हि भ्रष्टाचार करणारी आणि हफ्ताखोर पार्टी आहे. मग शिवसेनेला त्यांनी महापौर पदासाठी समर्थन व पाठिंबा का दिला ? भाजपाने मुंबईकरांना दिलेला हा खूप मोठा धोका आहे. मुंबईकरांची हि फसवणूक आहे. मुंबईकर शिवसेना व भाजपाला कधीच माफ करणार नाहीत, असे संजय निरुपम म्हणाले..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून टीका करत असतात, गृहमंत्र्यांचा टोला

News Desk

बाळासाहेबांना अटक करणाऱ्या बीजेपी सरकारचा जाहीर निषेध !

News Desk

“राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी ती प्रेस गांजा ओढून घेतली होती का?”, लसीकरणावरुन गोपीचंद पडळकरांचा सवाल

News Desk