HW News Marathi
महाराष्ट्र

कुमार आयलानींचा ओमी कलानीला विरोध का?

उल्हासनगर – ओमी कलानी यांचा भाजपामध्ये प्रवेश होण्याची शक्यता असल्याने राजीनामा देण्यासाठी शहरातील सर्व मंडळाध्यक्ष आल्याचे सांगत जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी शहरातले वातावरण तापवले होते. असे असतानाच सहापैकी पाच मंडळाध्यक्षानी ओमी कलानी भाजपामध्ये आल्यास पक्ष वाढणार असल्याने आम्ही विरोध करणार नाही, असे जाहीर केल्याने कुमार आयलानी हे ओमी कलानीचा प्रवेश टाळण्यासाठी खोटे बोलत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणुकीपूर्वी ओमी कलानी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार पद गमावलेले भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी ओमीचा हा प्रवेश थांबविण्यासाठी कंबर कसत आहेत. शहरातील सर्व सहा मंडळाध्यक्ष राजीनामा देणार आहेत, या त्यांच्या विधानाबाबत कॅम्प 3 चे मंडळाध्यक्ष बच्चन तोमर यांना राजीनाम्याबाबत विचारले असता गुरुवारी जिल्हाध्यक्ष कार्यालयात बैठक झाल्याचे मान्य केले. मात्र या बैठकीत राजीनाम्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. ओमी कलानीला वरिष्ठांनी पक्षात प्रवेश दिल्यास, आम्ही त्याचे स्वागत करू असेही ते म्हणाले. याबाबत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रकाश माखिजा यांनी सांगितले की, पाच मंडळाध्यक्ष ओमी कलानीच्या भाजपा प्रवेशाच्या बाजूने आहेत.

राजकीय अस्तित्व धोक्यात?

विधानसभा निवडणुकीत मोदींची हवा असूनही उल्हासनगरमधून विद्यमान आमदारकुमार आयलानी यांना पराभूत करून राष्टवादी काँग्रेसच्या ज्योती कलानी निवडून आल्या होत्या. आता कलानी कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केल्यास पुढील विधानसभा निवडणुकीत कुमार आयलानींना भाजपाचे तिकीट मिळणेही कठीण होईल. त्यामुळे आयलानी यांनी ओमी कलानींच्या भाजपाप्रवेशाला विरोध चालवल्याचे भाजपाच्या गोटातून खाजगीत सांगण्यात येते आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेची कोंडी करत राज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन

News Desk

कर्जमाफीसाठी शेतकरी – प्रहार संघटनेची आसुड यात्रा

News Desk

पोलीस बदलीबाबत सिताराम कुंटे यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप

News Desk