HW News Marathi
महाराष्ट्र

तर संघाच्या कार्यालयात घुसून धडा शिकवू भारिपचा इशारा

ठाणे : मध्यप्रदेशातील महु येथील कार्यक्रमावरून मुंबईत परतणाऱ्या भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा केलेल्या अयशस्वी प्रयत्नाच्या निषेधार्थ ठाण्यात भारिपच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन करीत अमित शाहच्या पोस्टरला चपला मारीत निषेध नोंदविला. दलित समाज विरोधी भाजप कार्यकर्त्यांना आवारा अन्यथा संघाच्या कार्यालयात घुसून धडा शिकवू असा इशारा भारिप कार्यकर्त्यांनी दिला.

भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरील भाजपा कार्यकर्त्यांचा अयशस्वी हल्ला, तर दुसरीकडे उल्हासनगर पालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पालिकेचा महारवाडा करायचा नाही असे भाष्य करून दलितांच्या भावना दुखावल्या तिसरीकडे ठाणे पालिकेने १९२ गटई कामगारांना वाटप केलेले स्टोल्स पैकी १५० जणांचे परवाने अपात्र ठरवले अशा विविध दलित विरोधी कारवायाबाबत दोषी संबंधितावर कारवाई करावी तसेच सरकारने लक्ष वेधावे यासाठी ठाण्यात भारिपच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होऊन अभिनव आंदोलन केले. तर या दरम्यान भारिप राष्ट्रीय नेत्यांवर केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी सरकारला समाज व्यवस्थेला धोका ठरणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना आवारा अन्यथा भारिप कार्यकर्ते संघाच्या कार्यालयात घुसून धडा शिकवतील असा इशारा सरकारला दिला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदेवबाबा, अनिल अंबानींना दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार !- नाना पटोले

News Desk

Prithviraj Chavan Exclusive | काश्मीरची नाही, ही निवडणूक महाराष्ट्राची आहे !

swarit

आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू, राऊतांचा भाजपला इशारा

News Desk