HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक जगदिश कदम यांना दर्पण पुरस्कार जाहीर

उत्तम बाबळे

नांदेड :- येथील प्रसिद्ध साहित्यिक व यशवंत महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक जगदिश कदम यांना बृहन्महाराष्ट्र संपादक संघ पुरस्कृत पत्रमहर्षी वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्‍या राज्यस्तरीय रौप्य महोत्सवी पुरस्काराची घोषणा संस्थेचे अध्य रविंद्र बेडकिहाळ यांनी केली.

पत्रकार साहित्य पुरस्कारासाठी रोख पाच हजार रुपये, सन्मापत्र, शाल श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते ६ जानेवारी रोजी दर्पण दिनी पोंभुर्ले जि. सिंधुदूर्ग येथे सन्मानीत करण्यात येते. डॉ.जगदीश कदम हे नांदेड जिल्ह्यातील रूई ह्या छोट्याशा गावी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी यशवंत महाविद्यालय,नांदेड येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून दीर्घकाळ सेवा केली असून कथा,कविता, नाटक,कादंबरी,चरित्र, समीक्षा,वृत्तपत्र स्तंभलेखन अशा विविध प्रकारात सोळा पुस्तकांचे लेखन केले आहे.विद्यार्थीदशेत त्यांनी युवकांच्या प्रश्नांवर सा. मनोहर,सा. माणूस अशा मान्यवर नियतकालिकांतून लिहिले आहे.त्यांच्या रास आणि गोंडर या कवितासंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार,नाशिकचा विशाखा प्रथम पुरस्कार,पुण्याचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार,कोपरगावचा रोहमारे पुरस्कार असे एकूण चौदा पुरस्कार मिळाले असून त्यांच्या कथा, नाटक आणि कादंबरीला सुध्दा राज्यपातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष,राज्य शासनाच्या मराठी चित्रपट अर्थसाहय समितीचे सदस्य तसेच मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.सध्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मुक्काम पोस्ट आणि पडसाद ही वृत्तपत्रीय सदरे विषेश लोकप्रिय ठरलेली आहेत.ग्रामीण माणूस हा त्यांचा साहित्याचा केंद्र बिंदू असून शोषित,पिडीड माणसाचे दुःख त्यांनी आपल्या साहित्यातून मुखर केले आहे.डॉ. कदम यांच्या एकूण साहित्य आणि वृतपत्रीय लेखनाची दखल घेऊन बृहन्महाराष्ट्र पत्रकार संघाने वसंतराव काणे साहित्यिक पुरस्कार जाहीर केला आहे.त्यांच्या या गाैरवाबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या कार्यक्रमातील ‘तो’ व्हिडिओ काँग्रेसने केला ट्वीट

Aprna

“अमरावती हिंसाचार षडयंत्राचा भाग होता का ?,” मलिकांचा भाजपवर आरोप

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या पायगुणाने आता फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले, निलेश राणेंचा प्रहार! 

News Desk