उत्तम बाबळे
नांदेड – नांदेड जिल्ह्यात २ जून रोजी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज पडल्यानं मौ.खरबी (ता.भोकर) येथील एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. तर याच गावातील एका गायीचे वासरु ठार झाले आहे.तर मौ.ईळेगाव (गंगापट्टी) ता.उमरी येथील एका शेतक-याची किमती म्हैस ठार झाली आहे.जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरु आहेत.
नांदेड जिल्ह्यातील कांही तालुक्यात २ जून २०१७ रोजी सायंकाळी ५:०० ते ६:०० वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडासह पाऊस पडला.याच दरम्यान झालेल्या पाऊसात भोकर तालुक्यातील माै.खरबी येथील शेतकरी बालाजी हुसेन्ना डूबेवाड यांच्या शेतातील गोठ्यावर विज पडली.यात ते भाजले व जखमी झाले असून गायीचे वासरु जागीच ठार झाले.घटनास्थळी भोकर तहसिलचे मंडळ अधिकारी महेश वाकडे व तलाठी बाबूराव मुळेकर यांनी भेट दिली व रितसर पंचनामा केला आहे.तर जखमी शेतकरी बालाजी डूबेवाड यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र बारड ता.मुदखेड येथे प्रथमोपचार करण्यात आले व अधिक उपचारार्थ नांदेड येथे त्यांची रवानगी करण्यात आली.त्यांच्यावर नांदेड येथील शासकिय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
तसेच मौ.ईळेगाव (गंगापट्टी) ता.उमरी येथील शेतकरी आनंदराव रामजी कवळे यांच्या शेतातील एका झाडाखाली बांधलेल्या ६० ते ७० हजार रुपये किमतीच्या म्हशीवर वीज पडली.यात ती जागीच ठार झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.