HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड : कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार जाहिर

तृुप्ती देसाई,नुतनबेन देसाई,डॉ.सुलभा कोरे, मनुश्री पाटील, सविता गिरे व रश्मी पुराणीक यांना कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार जाहिर

उत्तम बाबळे

नांदेड :- कै.कुसुमताई चव्हाण सामाजीक महिला भूषण पुरस्कार तृप्ती देसाई,नुतनबेन देसाई, डॉ. सुलभा कोरे, मनूश्री पाटील, सविता गिरे पाटील व रश्मी पुराणीक यांना जाहिर करण्यात आला असून मान्यवरांच्या उपस्थित दि. 8 मार्च 2017 रोजी सायंकाळी 6 वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे प्रदान करण्यात येणार आहे.

मीमांसा फाऊडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, समीक्षा, पत्रकार प्रेस परिषद, ह्युमन राईट्स फाऊडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने दरवर्षी जागतीक महिला दिनी राज्यातीलच नव्हे तर देशातील नामवंत महिलांचा कुसुमताई चव्हाण सामाजीक महिला भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाचे हे आठवे वर्ष आहे.मागील अनेक वर्षापासून स्त्री-पुरूष समानतेसाठी लढा देत शनी मंदीर प्रवेश किंवा हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्यासह अनेक ठिकाणी लढा देणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि अगदी दुष्काळात गावे दत्तक घेऊन तिथे पाण्याचे तळे, चारा, गो-रक्षणाची जबाबदारी घेऊन गरजवंताना मायेची साथ देणार्‍या मुंबई येथील समस्त महाजन परिवाराच्या नुतनबेन देसाई, पत्रकरितेसह साहित्य जगतात आपले नांव लौकीक करणार्‍या डॉ. सुलभा कोरे, पत्रकारितेत आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणार्‍या आयबीएन लोकमतच्या मनूश्री पाटील, प्रतिष्ठाप्राप्त नियतकालीकातून शोध निबंध सादर करत स्पर्धात्मक भावनेसह अाधुनिक मंत्रावर विश्वास ठेवणार्‍या सातार्‍याच्या सौ.सविता गिरे पाटील व नावीन्यांचा शोध घेत एक तपापेक्षा अधिक काळापासून रिपोर्टर म्हणून काम करणार्‍या राजकीय विश्लेषक पत्रकार रश्मी पुराणीक यांना जाहिर करण्यात आला आहे. मानचिन्ह व मानपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

तरी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे अावाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, दिलीप माहोरे, पुनीता रावत, संगीता बारडकर, पत्रकार प्रेस परिषदेचे प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, शिवहरी गाढे, श्रीमती उषा हडोळतीकर, जयालक्ष्मी गादेवार, रूपाली रघुजीवार, सुनीता मुत्तेपवार, हेमा बारडकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश पांडे आणि पत्रकार प्रेस परिषदेचे राज्याध्यक्ष तथा संघाचे जिल्हा सरचिटणीस रूपेश पाडमुख यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिवसेना, भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही पवार यांनी सरकार बनवलं” – रावसाहेब दानवे

News Desk

नितीशकुमार यांच्या पक्षाचं महत्व कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला – पृथ्वीराज चव्हाण 

News Desk

विधानभवनाच्या पायऱ्यावर ‘शीर्षासन’ करून भुरळ पडणारे आमदार संजय दौंड यांचा फिटनेस फंडा

Aprna