HW Marathi
महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यातील अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा  

नांदेड ।  मराठवाड्यात विविध ठिकाणी येत्या 48 तासात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहना जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे याबाबत इशारा देण्यात आला असून येत्या 48 तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विविध यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या आहेत. विशेषत: शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या शेतमालाबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिके आणि धान्यसाठ्याची काळजी घ्यावी व कापलेले धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेली धान्य सुरक्षित राहतील, याची काळजी घ्यावी. वीज चमकत असताना उंच झाडाचा आसरा घेणे टाळावे व सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन सावधगिरी बाळगावी. गाव, तालुका व उपविभागाच्या ठिकाणी असा प्रश्न उद्भविल्यास स्थानिक प्रशासनास व नागरीकांस सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून  देण्यात आल्या आहेत.
याशिवाय अत्यावश्यक बाबींसाठी तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी तसेच पुढील दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा. हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय  नियंत्रण कक्ष- 02462-235077, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 1077, महानगरपालिका नियंत्रण कक्ष- 02462 234461, पोलीस नियंत्रण कक्ष- 02462 234720, आरोग्य विभाग- 02462 236699, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 108. आपत्तकालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधता येईल.

Related posts

राज्यातील ‘हा‘ जिल्हासुद्धा होणार लाॅकडाऊन…

News Desk

‘MPSC परीक्षा रद्द होऊ नयेत’ हे माझं वैयक्तिक मत होतं, मात्र…! भुजबळांची नाराजी ?

News Desk

कॉंग्रेसने ठणकावल्यानंतर सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार? भाजपचा सेनेला सवाल

News Desk