HW Marathi
महाराष्ट्र

नांदेड महानगरपालिकेत दोन नगरसेवकांत तुंबळ हाणामारी

उत्तम बाबळे

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सभागृहात शनिवारी (दि.1) भाजप व संविधान पक्षाच्या नगरसेवकांमध्ये पाणी प्रश्नावरुन सभागृहात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकारामुळे पालिका सभागृहाचे रुपांतर कुस्तीच्या आखाड्यात झाल्याचे चित्र होते.

शनिवारी नांदेड महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे नगरसेवक अभिषेक चौबे यांनी शहरात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याचा मुद्दा सभागृहात मांडला. मात्र, अर्थसंकल्पीय सभेत इतर मुद्दे मांडून व्यत्यय आणू नये, असे सांगत संविधान पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी चौबे यांच्या प्रश्नावर आक्षेप घेतला. त्यामुळे चौबे व देशमुख यांच्यात शाब्दिक बाचाबाचीला सुरूवात झाली. थोड्याचवेळात याचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेनंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. गोंधळामुळे महापौर शैलजा स्वामी यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. काही वेळानंतर महापौरांनी मध्यस्थी करत सभागृहाचे कामकाज सुरू केले.लोकप्रतिनिधी लोकहिताचे मुद्दे मांडत असले तरी लोकशाहीची चौकट मात्र मोडत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट दिसून आले.

Related posts

आरोग्यमंत्री राजेश टोपे आज पुण्यातील NIV आणि नायडू हॅास्पिटलला भेट देणार

Arati More

#COVID19 : देशातील ६३ टक्के कोरोनाबळींचे वय ६० पेक्षा अधिक, आरोग्य मंत्रालयाची माहिती

News Desk

‘त्या’ ट्वीटमुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अडचणीत

News Desk