HW Marathi
महाराष्ट्र

फळभाज्यांचे भाव गगनाला

नाशिक : काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आवक घटली आहे. त्याच वेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुजरातमध्ये मोठया प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजीत आहेत.  परिणामत; किरकोळ बाजारात फळभाज्यांचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आहे.

नाशिक बाजारसमितीतून गुजरात राज्यात शेतमालाला मागणी वाढलेली असल्याने बाजारभावात तेजी निर्माण झालेली आहे. ढोबळी मिरची ३० रूपये प्रति किलो, लामडी वांगी ५० रूपये, दोडका ४० रूपये, भोपळा ३० रूपये नग, हिरवे वांगी ३५ रूपये, लाल वांगी ४० रूपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असल्याचे भाजीपाला व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.

पावसाने सध्या उघडीप दिलेली असली, तरी नवीन फळभाज्या दाखल झाल्या नसल्याने बाजारभाव तेजीत आहे. मात्र आगामी काही दिवसात सर्वच फळभाज्या मोठया प्रमाणात दाखल होण्याची शक्यता असल्याने बाजारभाव घसरण्याची शक्यता असल्याचे बाजारसमिती सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत किमान ४० रुपये प्रतिकिलो बाजारभाव असलेल्या फळभाज्या किरकोळ बाजारात व हातगाडीवर ग्राहकांना ७० ते ८०रुपये प्रतिकिलो दराने खरेदी कराव्या लागत आहेत

Related posts

डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर

News Desk

महाराष्ट्रातील भाजप ‘शिवभक्तां’चे मौन चिंताजनक – सामना अग्रलेख

News Desk

हिंगणघाट जळीत कांड | पीडितेच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करू !

rasika shinde