HW News Marathi
महाराष्ट्र

बेळगाव सीमा भागातील लोकांच्या भावना लक्षात घ्या- आ. डॉ. नीलम गो-हे यांची मागणी

मुंबई देशात भाषावाद राज्य रचना यामागे भौगोलिक व सांस्कुतिक जोपासनेतून त्या त्या राज्यांची अस्मिता शाबूत रहावी व सर्व द्रुष्टीने विकास व्हावा या भावनेतून निर्माण झालेल्या राज्यातून सार्वभोम या भारत तथा हिंदुस्थानच्या एकात्मतेला तडा जाईल अशी कर्नाटक सरकारने त्या राज्याचा वेगळा स्वतंत्र झेंडा असावा अशी मागणी दिनांक १७ जुलै २०१७ रोजी करणे हा कर्नाटकच्या कॉग्रेजी राज्यकर्ताची ही दळभद्री कल्पना म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारी असून या देशाच्या स्वातंत्रासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या ब्रिटींशांविरुध्द लढा देवून हुतात्मे पत्करले आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या निर्मितीनंतर या देशाचा तिरंगा फडकवू लागला त्या देशातील स्वातंत्रवीरांच्या अवमान व तिरंग्याचा अवमान आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे व देश सुरक्षित रहावा यासाठी सीमेवर लढणा-या जवानांचाही अवमान आहे आणि हाच दक्षिणेकडील राज्यांत राष्ट्रीय भावनेचा -हास होत असल्याचा पुरावा आहे. महाराष्ट्र राज्य हे नुसते पुरोगामी राज्य नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी या राज्यातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी हौतात्म्य पत्करलेले आहे.

ज्यावेळी देशाच्या संरक्षणासाठी हिमालयाने सहयाद्रीला हाक दिली, त्यावेळी हा महाराष्ट्र सर्वस्वाचा त्याग करुन देशाच्या सुरक्षिततेसाठी खंबीरपणे उभा राहीला हा इतिहास आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दक्षिणेकडीत राज्यात विशेषत कर्नाटक राज्यात महाराष्ट्र राज्याच्या व्देषभावनेचा कहर देशाच्या तिरंग्याला दुय्यम समजण्यापलिकडे कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांची मजल जावी ही विषारी प्रव्रुत्ती या विषारी प्रव्रुत्तीचा निषेध करुन केंद्र शासनाने तत्काळ कर्नाटक राज्य केंद्रशासित करावे वा बरखास्त करावे असा ठराव या विधान परिषदेत व विधानसभेत एकमताने मंजूर करुन महाराष्ट्र हा देशाच्या सार्वभौमत्वाला कदापी तडा जाऊ देणार नाही याची हमी दयावी. यासाठी मी हा औचित्याचा मुददा मांडीत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीने सुरुवात 

News Desk

‘किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल’; नवाब मलिकांचा टोला

News Desk

“आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, मात्र पवारांनी विश्वास ठेवला” – धनंजय मुंडे

News Desk