HW News Marathi
महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : चौकशी आयोगाने ‘या’ सहा राजकीय पक्षांना पाठविले समन्स

मुंबई | कोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी आयोगाने राज्यातील सहा राजकीय पक्षांच्या प्रमुख किंवा प्रदेशाध्यक्षांना समन्स जारी करण्यात आले आहे. या प्रकरणी आयोगाने बुधवारी (8 जून)  सर्वांना 30 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर पाठवायचे आहे. तसेच राज्यातील सर्व राजकीय पक्षाने त्यांचे मत मांडण्यासाठी आयोगासमोर यावे, असे कोरोगाव भीमा हिंसाचार चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त मुख्य न्यायमुर्ती जय नारायण पटेल आणि आयोगाचे सदस्य मुख्य माहिती आयुक्त समित मलिकांनी म्हटले आहे.

पुण्यातील शिरुर तालुक्यातील कोरेगाव-भीमा येथील 1 जानेवारी 2018 विजयस्तंभ जवळ जमलेल्या जमावार दगडफेक आणि जाळपोलच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी आयोगाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचारात एकाचा मृत्यू तर पाज जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभर बंद पुकारण्यात आला होता. कोरेगाव भीमा हिंसाचारात कलकत्ता उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगाला 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुतदवा देण्यात आली होती. यानंतर कोरोना काळात या आयोगाच्या कामकाज पूर्ण पुन्हा एकदा सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली.

राज्यातील या सहा पक्षांना आयोगाने पाठवले समन्स

१) उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

२) नाना पटोले, अध्यक्ष, काँग्रेस

३) चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

४) राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

५) ॲड. बाळासाहेब आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

६) रामदास आठवले, अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ)

 

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाणांविरोधात विनायक मेटेंची उच्च न्यायालयात याचिका

News Desk

“अहो त्या प्रीवेडिंगवाल्यांना कशाला अडवताय…” अजित पवारांनी दिला प्रेमळ दम

News Desk

जळगावमध्ये क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात, ११ जणांचा मृत्यू

News Desk