HW Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे अपघातग्रस्त हेलीकाॅप्टर चाैकशी समितीने मध्यरात्री मुंबईकडे रवाना

उत्तम बाबळे

नांदेड :- लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे कोसळलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे हेलीकाॅप्टर २९ मे रोजी मध्यरात्री उच्चस्तरीय चाैकशीसाठी चाैकशी समितीने एका ट्रकद्वारे निलंग्याहून मुंबईकडे रवाना केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे निलंगा दाै-यावर आले असतांना मुंबईकडे परत निघाले असता २५ मे रोजी निलंगा येथे त्यांना घेऊन जात असलेले हेलीकाॅप्टर काही तांत्रीक बिघाडामुळे उडान घेतांना कोसळले.या अपघातात जीवित अथवा कसलीही मोठी हाणी झाली नाही हे सर्वांचेच सुदैव.ज्याच्या घरावर ते कोसळले त्या भारत मारोती कांबळे यांचे घर जमीनदोस्त झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना निलंगा नगर पालिकेने पालिकेच्या निवा-यात तात्पुरचे हलविले आहे.२५ मे पासून हे कुटूंबीय  तात्पुरत्या निवा-यात आहेत.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस ,प्रधान सचिव ,स्विय सहाय्यक व दोन पायलट  असे महत्वाचे लोक यातून बचावले आणि कांबळे कुटूंबिय देखील बचावले.परंतू नेमके कोणत्या तात्रीक बिघाडामुळे हेलीकाॅप्टर कोसळले याचा शोध घेण अत्यंत गरजेचे आहे.यासाठी एक चाैकशी समिती नेमण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते.गोपनियतेच्या नावाखाली या समितीत कोण आहेत ? हे समजू शकले नाही.सदरील चाैकशी समितीतील एक सदस्य व हेलीकाॅप्टर कंपनीचे अधिकारी यांनी २९ मे २०१७ रोजी हे अपघातग्रस्त हेलीकाॅप्टर मध्यरात्री निलंग्याहून मुंबईकडे रवाना केले आहे. सदरील अपघातग्रस्त हेलीकाॅप्टरच्या तांत्रीक बिघाडाची चाैकशी ही निष्पक्षपाती व्हावी व अपघातामागील गोडबंगालाचे सत्य समोर यावे ही राज्याच्या जनतेकडून अपेक्षा व्यक्त होत असून बेघर झालेल्या कांबळे कुटूंबियांचेही त्वरीत स्वत:च्या घरात लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे ही निलंग्यातील गरीब नागरिकांकडून मागणी होत आहे.

Related posts

सरकासोबत अनेक अदृष्य हात

News Desk

राज्यात बारावीचा निकाल ९०.६६% लागला, तर यावर्षी देखील मुलींनी मारली बाजी !

News Desk

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत !

News Desk