Site icon HW News Marathi

राज्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याने दिला इशारा

मुंबई | राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

दरम्यान, मुंबईच्या सुमद्रात सध्या 4. 47 मीटर उंचच्या लाटा उसळलेल्या दिसत आहेत. मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्याकडे न जाण्याचे बीएमसीने नागरिकांना आवाहन केले आहे. तसेच राज्यात पालघर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत धोक्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

 या राज्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट केले जारी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून शेती पिकांचे मोठे नुकासान झाले आहे. राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रासह देशभरात पावसाने तैमान खातला आहे. गुजरामध्ये पूरजन्य परिस्थिती उद्धवली असून गुजरातमध्ये पूर स्थितीमुळे 63 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

 

 

 

 

Exit mobile version