HW News Marathi
महाराष्ट्र

सहाव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे: एमबीए करणाऱ्या एका विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री हडपसर येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची घटना नोंदवण्यात आली आहे. त्याने लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये कुत्रामेल्याचे दुख सहन न झाल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

कन्वर हर्षवर्धन जाधव(22,रा.मुळ इंद्रप्रस्थ, रायपूर) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

कन्वर हा रेंजहील्स येथील सिम्बायोसीस महाविद्यालयात एमबीए करत होता. त्याचे नातेवाईक हडपसर ठक्कर एनक्‍लेव्ह येथे रहातात. त्यांना भेटण्यासाठी तो महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून परवानगी घेऊन गेला होता. सोमवारी रात्री आठच्या सुमारास त्याने नातेवाईक बाहेर गेल्याची संधी साधून सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्याला तातडीने लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे मृत घोषीत करण्यात आले. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, त्याच्या जवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये त्याने कोणालाही दोषी धरले नसून कुत्रे मेल्याचे दुख सहन न झाल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. कन्वरचे वडिल लष्करात अधिकारी आहेत. त्याचे आजोबाही लष्करात होते. तो ज्या नातेवाईकांकडे आला होते तेही लष्करात कर्नल या पदावर काम करतात

यासंदर्भात सिम्बायोसीस संस्थेच्या प्रधान संचालक विद्या येरवडेकर म्हणाल्या, ही घटना घडली असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु होते. ही घटना दुर्देवी अशी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Vidhansabha2019 : कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष

News Desk

काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते !

News Desk

अनिल देशमुखांना १०० दिवस ED कस्टडी अन् जेलमध्ये रहावे लागेल- किरीट सोमय्या

News Desk