HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे समर्थक प्रशांत पवार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

नागपूर | काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे कट्टर समर्थक प्रशांत पवार आज (१६ ऑगस्ट) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. प्रशांत पवार ‘जय जवान जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत प्रशांत पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मित्रपक्षातील नेत्यांना पक्ष प्रवेश दिल्यावरुन याआधीही आघाडीत तणाव निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या नेत्याचा राष्ट्रवादीत होणार हा प्रवेश राज्याच्या राजकारणावर काय परिणाम करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील सुप्त राजकीय संघर्षाविषयी नागपूरमध्ये जोरदार चर्चा विषय ठरत आहे. या पक्षप्रवेशातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना शह दिल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
दरम्यान, याआधी पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला होता.

पारनेरमध्ये काय झाले होते?

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का बसला. पारनेरच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके हेदेखील उपस्थित होते. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे अशी राज्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांची नावं आहेत. त्यांनी ४ जुलैला शिवसेनेला रामराम ठोकत बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर शिवसेनेने देखील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या रणनीतीचा वचपा काढत कल्याणमध्ये नवी राजकीय खेळी केली. यानुसार शिवसेनेनं कल्याण पंचायत समितीमध्ये थेट भाजपशी हातमिळवणी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणूनच देशातील जुनी वाहने भंगारात काढणे गरजेचं असल्याची नितीन गडकरींची माहिती! 

News Desk

राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर, पुण्यात विद्यार्थ्यांनी संतप्त होत केलं ठिय्या आंदोलन

News Desk

फडणवीसांनी ‘ओबीसीं’चे नेतृत्व करावे!

News Desk