HW News Marathi
महाराष्ट्र

वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक पदी मोक्षदा पाटील

विनोद तायडे

वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची आजच पदभार स्वीकारला आहे .रुजू होताच त्यांनी पहिली पत्रकार परिषद आयोजित केली पत्रकार परिषदेत त्यानी वाशिम जिल्ह्यातून गुन्हेगारी हद्दपार करण्याचा प्लॅन आखला असून पोलीस दलात

पारदर्शकता आणणार असल्याची माहिती त्यानी दिली पुढे त्या म्हणाल्या की जिल्ह्यातील सर्वच अवैद्य धंदे बंद करण्यात येणार आहेत महिला व युवतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टी कोनातून जिल्ह्यात निर्भया पोलीस पथक कार्यण्वित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमे उपस्थित होते.

पोलीसांकडून न्याय मिळत नसेल, तर जनतेने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या ७३८७९६६४१० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधन्याचे आवाहन त्यांनी केले

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकातील हाईवोल्टेज ड्रामा : आमदारांमुळे पवईत मुंबई पोलिसांकडून संचार बंदी लागू

News Desk

 हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये | यशोमती ठाकूर

News Desk

भामरागड तालुक्यातील शंभर गावांचा जिल्हाशी संपर्क तुटला

News Desk