HW Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती न झाल्यास राज्यात भूकंप – उद्धव ठाकरे

शेगाव – शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मनसुबे पुर्ण होऊ देणार नाही, असा थेट इशाराही ठाकरे यांनी दिला आहे. तसेच शेतकरी कर्जमुक्त झाला नाहीतर राज्यात भूकंप येईल, असा भाकितवजा इशारा ठाकरे यांनी थेट दिलाय. शेगाव इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘सरकारने जी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे त्याची अंमलबाजावणी करण्याची ताकद आणि बुद्धी सरकारला देवो अशी प्रार्थना करतो’, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ‘आपला देश कृषीप्रधान आहे, मात्र शेतक-यांना सर्वात तुच्छतेची वागणूक दिली जाते’, अशी खंत उद्धव यांनी व्यक्त केली. ‘देशभरात शेतक-यांचा जो उद्रेक दिसतोय ती ठिणगी महाराष्ट्रात पडल्याचा आनंद’, असल्याचं उद्धव ठाकरे बोलले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं न घेता त्यांच्यावरही ठाकरेंनी टिका केलीय. ‘साले’ म्हणणाऱ्यांना शेतकरी रडवल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव यावेळी म्हणाले. ‘आंदोलन पेटण्यापूर्वी सरकारने निर्णय घेतला याचा आनंद आहे. सत्तेत असतानाही आम्ही विरोधात उभे राहिलो’, असंही उद्धव यांनी यावेळी सांगितलं. ‘शेतक-यांनो तुम्ही दुबळे आहोत असं समजू नका, एकजुटीला तडा देऊ नका नाहीतर हाताशी आलेला घास निघून जाईल’, असं आवाहन ठाकरेंनी केलं. तसंच शिवसेना तसा तो जाऊ देणार नाही असंही ठणकावून सांगितलं. ‘शेतकऱ्यांना  कर्जमाफी देतांना असे निकष ठरवू नका की ज्यामुळे शेतक-याला काहीच लाभ मिळणार नाही’, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी तयार असल्याचं वक्तव्य केल्याच्या प्रश्नावर बोलताना ‘मुख्यमंत्र्यांना शेतकरी कर्जाचा विषय बाजूला ठेवायचा असल्याने मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असावा’, असा टोला हाणला. ‘एवढा पैसा असेल तर तो शेतक-यांना द्या. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत तुमचे मनसुबे पुर्ण होऊ देणार नाही’, असा इशाराचा मुख्यमंत्र्यांना दिला आहे,

Related posts

शेतकऱ्यांना ‘जीवाणू’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मोर्चाची ताकद बघून धडकी भरली आहे | धनंजय मुंडे

News Desk

संपावर तोडगा म्हणून एसटी डेपो जवळून खाजगी वाहनाना सेवा देण्यास परवानगी

News Desk

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांचा विश्वासघातः खा. अशोक चव्हाण

News Desk