HW Marathi
महाराष्ट्र

संकटकाळी स्त्री हि पुरुषापेक्षा जास्त नेटाने उभी राहते कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

उत्तम बाबळे
नांदेड :- जीवनात अनेक संकटे येतात. घरातल्या कर्ता पुरुषाची संगत कधी कधी अचानकपने नाहीशी होते. मग तो अपघात, आजार किंवा आत्महत्या असेल. अशा कठीण प्रसंगामध्ये किंवा संकटकाळात स्त्रियांवर अनेक जबाबदाऱ्या एकदम येऊन पडतात. चार भिंतीती राहणाऱ्या महिलेसाठी तर असा प्रसंग म्हणजे अग्निपरीक्षाच असते. अशा कठीण प्रसंगी किंवा संकटकाळी स्त्री हि पुरुषापेक्षा जास्त नेटाने उभी राहते. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.

ते आज, ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला दिन कार्यक्रमामध्ये विद्यापीठाच्या अधिसभागृहामध्ये बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी. बी. पाटील, डॉ. वैजयंता पाटील, डॉ. माधुरी देशपांडे, यांची उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, स्त्री नेटाने उभी राहते म्हणून मुला-मुलींचे पालन पोषण, शिक्षण,लग्नकार्य इत्यादी व्यवस्तीत पार पडते.आपल्या समाजातील परंपरागत संस्कारामुळे  पुरुष वर्चस्व संस्कृती आहे. पण आता त्यामध्ये आमूलाग्र बदल होताना दिसून येत आहे. अनेक क्षेत्रामध्ये स्त्रियांना सामान स्थान देण्यात येत आहे. होणाऱ्या अन्यायाबद्दल स्त्रियांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. स्वतःला बदललं पाहिजे. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःचा पायावर उभे राहिले पाहिजे.जो पर्यंत महिला स्वतःमध्ये बदल घडहून आणणार नाही तो पर्यंत समाजामध्ये खरा बदल घडणार नाही.

या वेळी डॉ. माधुरी देशपांडे, डॉ. योगीनी सातारकर, उज्वला हंबर्डे, कु. वैष्णवी कोळंबीकर, कु. पुजा भांगरे, इत्यादी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व महिला प्राध्यापिका, महिला अधिकारी, तथा महिला कर्मचारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कुलसचिव बी. बी. पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. राजेन्द्र दुडुकनाळे यांनीं केले.

Related posts

भंडाऱ्यामध्ये वडापाची टॅक्सी नदीत कोसळून भीषण अपघात

News Desk

उद्धवजी लाॅकडाऊनपेक्षा संचारबंदी करा !आव्हाडांची मागणी ..

Arati More

आमचं युतीबाबत ठरलंय…अन्य कोणीही त्यात तोंड घालू नये !

News Desk