HW Marathi
महाराष्ट्र

सांगोल्यातील उद्योजकाच्या घरातून दीड कोटींचा गांजा जप्त, गांजासोबत 25 लाखांचा रोकडही हस्तगत

 अभिराज उबाळे

सांगोल्यातील उद्योगपती सतीश वाघ यांचा प्रताप उघड

पंढरपूर सांगोला । येथील प्रसिद्ध उद्योजक सतीश वाघ यांच्या घरातून सुमारे तीनशे किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. गांजाची बाजारातील किंमत सुमारे दीड कोटी इतकी आहे. या वेळी वाघ यांच्या घरातून 25 लाखांची रोकडदेखील जप्त करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस प्रमुख विरेश प्रभू यांच्या आदेशान्वये पोलिस आधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षर हारून शेख, महिला सपोनि स्वाती सूर्यवंशी, पोलीस हवालदार हनुमंत माळकोटगी, सुरेश पाटोळे, आबा मुंडे मुखावर, शिवाजी काळेल, शिवाजी जाधव, आरती खोत यांनी शनिवारी दुपारी चारच्या सुमारास शहरातील कुंभारगल्ली येथील सतीश वाघ यांच्या राहत्या घरावर धाड टाकून रोख रक्कम व ३०० किलो गांजा पकडला. या गांजाची किंमत सुमारे दीड कोटी रूपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related posts

“सुधीर मुनगंटीवारांचं भाषण पाहताना ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला”, मुख्यमंत्र्यांची कोपरखळी  

News Desk

राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी आता सरकारचे ‘महाजॉब्स वेबपोर्टल’

News Desk

‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर

अपर्णा गोतपागर