HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांचे वक्तव्य म्हणजे अपरिपक्वता – पंकजा मुंडे

सय्यद जमील

परभणी – जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला आता वेग येऊ लागला असून महिला,बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राज्याच्या पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रचार सभा घेतली . यावेळी पत्रकारांशी बोलतांना अजित पवार यांनी काल केलेल्या विधानाचा समाचार घेत राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण असल्याची टीका पंकजा यांनी केली

राज्यातील जिल्हापरिषद निवाडणुकांसाठी मंत्री मंडळ आता प्रचाराला लागले असून आज बोरी सर्कल मधील जीप आणि पंचायत समिती उमेदवार यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे आणि बबनराव लोणीकर परभणी दौऱयांवर होते , यावेळी सभेनंतर पत्रकारांशी बातचीत करताना अजित पवार यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर काल केलेल्या आरोपांचा प्रश्नावर “राजकारणात एवढा अनुभव असलेल्या नेत्यांनि अशा प्रकारे दिवंगत नेत्यावर टीका करण राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण असल्याचं म्हंटल तर धनंजय मुंडे आमच्या बाबतीत काहीही झालं की ते उत्साहाने बाईट देतात पण दोन दिवस झाले तरीही ते मीडियाला सापडत नाहीत अशी टीका त्यांनी केली .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राऊतांनी उगाच मिठाचा खडा टाकू नये”, गृहमंत्र्याबद्दलच्या वक्तव्यावर अजित पवारांनी फटकारले

News Desk

ज्येष्ठ काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी पुण्यात निधन!

News Desk

लवकरच बनावट सोशल अकाउंट्सचा खुलासा करू, ज्याला भाजपच्या IT विभागाने बनवले आहे – सचिन सावंत

News Desk