HW News Marathi
महाराष्ट्र

अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणास अॅड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दर्शविली सकारात्मक भुमिका 

अॅड.बाळासाहेब आंबेडकर व लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच एक निर्णायक व्यापक बैठक होणार !

उत्तम बाबळे

नांदेड :- अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अ,ब,क,ड चे मुख्य प्रवर्तक राष्ट्रीय लोकनेते मंदाकृष्णा मादिगा व आंबेडकरी चळवळीचे महानेते अॅड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची २ मार्च रोजी मुंबई येथे एक महत्वपुर्ण बैठक झाली असून अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणास सकारात्मक भुमिका व अनुकूलता दर्शविली आहे.तर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ३ मार्च रोजी त्यांच्या निवास स्थानी हैद्राबाद (तेलंगणा राज्य) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ” आम्ही उत्तर प्रदेश निवडणुकी नंतर लवकरच अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अ,ब,क,ड चा निर्णय घेऊ !” असे सुतोवाच केले आहे.उपरोक्त दोन्ही बाबींच्या अनुषंगाने अनुसूचित जातीतील वंचित,उपेक्षीतांची पुढील आंदोलनात्मक रणनिती व भुमिका ठरविण्यासाठी अॅड.बाळासाहेब आंबेडकर व लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांच्या मुख्य उपस्थितीत विविध पक्ष,सामाजिक संघटना,कर्मचारी संघटनेचे प्रमुख नेते,पदाधिकारी,व कार्यकर्त्यांची एक निर्णायक व्यापक बैठक मुंबई किंवा हैद्राबाद येथे लवकरच होणार आहे. आॅल इंडिया एम.आर.पी.एस.तथा मातंग आरक्षण संघर्ष समितीचे संस्थापक राष्ट्रीय लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांनी २ मार्च २०१७ रोजी एक दिवशीय मुंबई दाैरा केला.या दाै-यात त्यांनी मुंबईतील विविध पक्ष,सामाजिक संघटनांच्या काही प्रमुख नेते व पदाधिका-यांच्या भेटी घेतल्या.याभेटीत प्रामुख्याने आंबेडकरी चळवळीतील महानेते तथा भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली असता अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अ,ब,क,ड विषयी दोन नेत्यांत सविस्तर चर्चा झाली व चर्चेअंती आरक्षण वर्गीकरणास अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी सकारात्मक भुमिका तथा अनुकूलता दर्शविली.यावेळीi एम.आर.पी.एस.महाराष्ट्र अध्यक्ष शंकर अण्णा येरोला,महासचिव अजित केसराळीकर यांसह आदीजण उपस्थित होते. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू हे विधीमंडळ कामकाज पटलावर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा प्रस्ताव मंजूरीसाठी मांडणार होते.परंतू नोटबंदी मुद्द्यांवरुन लोकसभेचे कामकाज व्यवस्थितपणे होऊ न शकल्याने यावेळी हा प्रस्ताव मांडता आला नाही.तो पुन्हा आगामी अधिवेशनात मांडण्यात यावा या मागणीच्या पार्श्वभूमीवर मा.ना. व्यंकय्या नायडू यांची लोकनेते मंदाकृष्णा मादिगा, शंकर अण्णा येरोला,अजित केसराळीकर ,नरसिंग शिंदे यांसह आदींनी भेटी घेतल्या. यावेळी मा.ना.व्यंकय्या नायडू यांनी शिष्ठमंडळास आश्वस्त केले आहे. ३ मार्च रोजी मा.ना.व्यकय्या नायडू यांनी त्यांच्या निवास स्थानी हैद्राबाद (तेलंगणा राज्य) येथे एक पत्रकार परिषद घेतली व यावेळी त्यांनी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अ,ब,क,ड चा निर्णय उत्तर प्रदेश च्या निवडणुका संपल्या नंतर लवकरच घेऊ असे पत्रकारांना सांगीतले आहे. या न्या हक्क मागणीच्या मंजूरीस्तव आंदोलनात्मक रणनिती न निर्णायक भुमिका ठरविण्यासाठी मा.अॅड.बाळासाहेब आंबेडकर व लोकनेते मंदाकृष्णा मादिगा यांच्या मुख्य उपस्थितीत मुंबई किंवा हैद्राबाद (तेलंगणा राज्य)येथे विविध पक्ष,सामाजिक संघटना,कर्मचारी संघटनांच्या कांही प्रमुख नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्वपुर्ण बैठक घेण्यात येणार आहे.बैठकीचे निमंत्रण ,ठिकाण,तारिख व वेळ निश्चिती लवकरच कळविण्यात येणार आहे.या बैठकीसाठी सहभागी होऊ इच्छीना-यांनी आपले नाव एम.आर.पी.एस.महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीकडे नोंदवावीत .असे शंकर अण्णा येरोला,अजित केसराळीकर ,नरसिंग शिंदे,सतिश कावडे,डाॅ.शशिकांत कसबे,जेष्ट साहित्यीक अण्णा धगाटे,महादेवी रणदिवे,डाॅ.योगेश साठे,प्रसिद्धी प्रमुख उत्तम बाबळे यांसह आदींनी आवाहन केले असून अधिक माहितीसाठी मो.नं.८४५२८९२१३०,९८३३१७३३१७ वर संपर्क साधावा व नाव नोंदणीसाठी All India MRPS-MASS, https://chat.whatsapp.com/E3bDedTVXL25dNgcv5ifEu या व्हाॅट्स अॅप लिंकवर आपला मोबाईल नंबर व परिचय पाठवावा .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी आता ऑनलाइन घेता येणार

News Desk

देवेंद्र फडणवीसांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग दाखल

News Desk

पोलीस उप निरिक्षक परीक्षेत नागनाथ तुकडे आणि अजय लोहेकर उतीर्ण

News Desk