HW News Marathi
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणी तिघांना २० वर्ष सक्त मजूरीची शिक्षा

उत्तम बाबळे

नांदेड :- गावाकडे जाणा-या हिमायतनगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस अॅटोरिक्षाने गावाकडे नेऊन सोडण्याचा बनाव करुन भोकर ते पाळज रस्त्यावरील जंगलात नेऊन सामुहिक बलात्कार करुन पाळज येथे सोडून पळ काढलेल्या तिघांना भोकर अतिरीक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधिश एम.एस.शेख यांनी २० वर्ष सक्त मजूरी व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा १ जुलै रोजी सुनावली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी गावाकडे जाण्यासाठी १८ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास भोकर रेल्वे स्थानकावर थांबली असतांना शेख अखलाक शे.लतिफ(२०) रा.महंमद नगर,भोकर या अॅटोरिक्षा चालकाने तिच्या गावाकडील काही लोकांची ओळख सांगीतली व त्या आधारे तिची ओळख करुन विश्वासात घेतले.तसेच त्याच्य अॅटोरिक्षाने तिला गावाकडे नेऊन सोडतो असे सांगून रिक्षात बसऊन एका हाॅटेलमध्ये नेले.तेथे तिला चहा बिस्कीट खायला दिले.याच दरम्यान त्याचे सहकारी मित्र पांडूरंग पंजाबराव पिल्लेवार (पिलवंड)(१९) रा.खाजा नगर,शनिमंदिर परिसर,भोकर व परमेश्वर माधव सुर्यवंशी (२२) रा.जाकापूर,ता.भोकर यांना तेथे बाेलाऊन घेतले.तसेच या तिघांनी तिला अॅटोरिक्षात बसविले व गावाकडे नेऊन सोडतोत म्हणण्याचा बहाना करत भोकर ते पाळजकडे दिवशी मार्ग रस्त्याने नेले.याच रस्त्यावरील पाळज जंगलात तिला अॅटोरिक्षातून उतरविले व या तिघांनी रात्री ९:०० ते ११:०० वाजताच्या दरम्यान जीवे मारण्याची धमकी देऊन आळी पाळीने बळजबरीने तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.यानंतर तिला अॅटोरिक्षाने तिघांनी पाळज ता.भोकर येथे नेऊन सोडले व ६४०/- रुपये देऊन पळ काढला.एक असह्य पिडीत अल्पवयीन मुलगी पाळज येथे रडत उभी असल्याचे काही प्रतिष्ठीत नागरिकांच्या निदर्शनास आल्यावरुन त्यांनी भोकर पोलीसांना याबाबदची माहिती कळविली.यावरुन भोकर पोलीसांनी पिडीत मुलीला भोकर पोलीस ठाण्यात आणले व तिच्या फिर्यादीवरुन १९ सप्टेंबर २०१५ रोजी गुरन १३९/१५ कलम ३३६(०२),(१),३७६(५),५०६ भादवि,५(ग),(६) बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायदा २००२ नूसार उपरोक्त तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरील गुन्ह्याचा तपास भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश कुमार गुप्ता यांनी केला.या तपासात तत्कालीन पो.नि.सुनिल नागरगोजे,सहाय्यक पो.नि.रेवनाथ डमाळे,पो.उप.नि.सुर्यतळे,पो.काॅ.प्रकाश श्रीरामे,पो.काॅ.बालाजी उमेवार,पो.ना.चंद्रशेखर मुंडे यांनी मदत केली.तसेच सखोल तपासाअंती दि.१४ डिसेंबर २०१५ रोजी उपरोक्त बलात्कारी तिघां विरुद्ध भोकर अति.जिल्हासत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरील गुन्ह्याचा खटला न्यायालयात चालू असतांना सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासले असता साक्षीदार व पिडीत मुलीची साक्ष गृहीत धरुन उपरोक्त तिघे यात दोषी आढळले.यावरुन अति.जिल्हासत्र न्यायालय भोकर चे न्यायाधिश एम.एस.शेख यांनी सबळ पुराव्या आधारे सामुहिक बलात्कार प्रकरणी व अल्पवयीन मुलीचा लैंगीक छळ केल्याच्या दोषात तिघांनाही २० वर्ष सक्त मजूरी व प्रत्येकी २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरीक्त वाढीव शिक्षा सुनावली आहे.या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड.एस.आर.कस्तूरे यांनी भक्कम युक्तीवाद केला.या कामात भोकर न्यायालयाचे पैरवी अधिकारी पो.काॅ.शेषेराव चव्हाण यांनी सहकार्य केले.तर आरोपीच्या वतीने अॅड.आर. डी.खाडे व अॅड.एस.टी.कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा

https://www.facebook.com/mahabatmi365/

ttps://twitter.com/Mahabatmi1?s=09

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर महाराष्ट्राचा दौरा अर्धवट, नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना होणार

News Desk

मुलांना शालेय शिक्षणाबरोबर चारित्र्य संपन्न घडवा! – उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

News Desk

अखेर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या हाती शिवबंधन!

News Desk