HW News Marathi
महाराष्ट्र

उल्हासनगरात मराठी नगरसेवकांचा वाढता टक्का

गौतम वाघ

महानगरपालिका स्थापने नंतर प्रथम महापौर

1963 ते 1968 पर्यंत 0,

1971 मध्ये 1,

1978 मध्ये 4,

1986 मध्ये 13,

2012 मध्ये 37 चा उच्चांक,

उल्हासनगर- एकेकाळी ज्या उल्हासनगरात पहिल्या तीन निवडणुकात केवळ सिंधी भाषिकांचीच नगरसेवक म्हणून वर्णी लागली, त्याच उल्हासनगर मध्ये टप्या टप्याने मराठी नगरसेवकांचा टक्का वाढू लागला आहे. येवढेच नाही तर याघडीला सर्वाधिक निवडून आलेल्या नगरसेवकांच्या उच्चाकांची संख्या मराठी भाषिकांची आहे.एकूण 78 नगरसेवकांपैकी मराठी नगरसेवकांची संख्या 37 असून त्याखालोखाल सिंधी भाषिक नगरसेवकांची संख्या 34 आहे.

हिंदुस्थान पाकिस्तान ची फाळणी झाल्यावर सिंध प्रांतातून निर्वासित म्हणून आलेले सिंधी बांधव 1949 मध्ये उल्हासनगरात स्थायिक झाले.गव्हर्नर सी.गोपालाचारी यांनी या शहराच्या कोनशिलेची स्थापना केल्यावर प्रशासकाच्या हाती शहराचा कारभार होता.त्यानंतर प्रथम नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्यावर पहिली निवडणुक झाली ती 1963 मध्ये पहिली निवडणूक झाली.त्यात सर्व 16 नगरसेवक सिंधी भाषिक निवडून आले.1964 मध्ये निवडून आलेले सर्व 35 नगरसेवक सिंधी भाषिकच होते.1968 साली 41 नगरसेवक निवडून आले ते देखील सर्वच सिंधी भाषिकच,

“1971 नंतर इतर भाषिक नगरसेवकांचा प्रवेश”

——————————

सलग तीन निवडणुकात सिंधी भाषिकांच्या दबदब्यात 1971 साली रघुनाथ राणे,आणि विमल गुप्ता हे मराठी व उत्तर भारतीय असे दोन नगरसेवक निवडुन आले.हा आकडा 1978 च्या निवडणुकीत दुपटीने वाढला.बाळकृष्ण कोरगावकर,श्रीपत साखरे,मनोहर गावडे-भाजपा,मधुकर धोंडे-रिपाइं या 4 मराठी नगरसेवकांनी नगरपरिषदेत प्रवेश केला.

“1986 मध्ये संख्या तीन पटीने वाढली.शिवसेनेची एंट्री”

मराठी नगरसेवकांच्या निवडून येण्याचा टक्का ख-या अर्थाने वाढू लागला,तो 1986 च्या नगरपरिषदेच्या निवडणुकी नंतर.86 साली शिवसेनेने वसंत चव्हाण,दिनकर श्रवण,बाजीराव चहाळभीमसेन मोरे,प्रकाश सावंत,प्रकाश जाधव,सुरेंद्र सावंत,प्रकाश महाडिक,रमेश मुकणे(स्विकृत) या नगरसेवकांनी नगरपरिषदेत एंट्री मारली.यासोबत हिरामण भालेराव,रामकृष्ण पांडे-काँग्रेस,आणि महादेव सोनावणे,रमेश आढाव,प्रल्हाद सोनावणे-रिपाइं हे नगरसेवकही निवडून आले.

नगरपरिषद असताना सर्वच वेळी नगराध्यक्ष पद हे सिंधी भाषिकांच्या ताब्यात राहिले.मात्र1996 साली नगरपरिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले.आणि शिवसेनेचे गणेश चौधरी या मराठी भाषिकाला पहिला महापौर बनण्याचा मान मिळाला.त्यानंतर पहिली महिला महापौर म्हणून शिवसेनेच्या यशस्विनी नाईक ठरल्या.याव्यतिरिक्त शिवसेनेच्या विद्या निर्मळे,लिलाबाई आशान,राजश्री चौधरी यांनी महापौर पद भूषविले असून याघडीला अपेक्षा पाटील ह्या महापौर आहेत.

सध्याची लोकसंख्या आणिव पॅनल रचना गृहीत धरून मराठी,सिंधी नगरसेवकांच्या टक्याची चढाओढ 21 फेब्रुवारी 2017 रोजी होणा-या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…. आरक्षण द्यावे नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही” – रावसाहेब दानवे

News Desk

नारायण राणेंचा कोथळा बाहेर काढण्याचं शिवसेना आमदाराचं विधान!

News Desk

ठाकरे सरकारमध्ये ‘या’ मंत्र्यांना मिळाले नाही पालकमंत्री पद

News Desk