HW News Marathi
महाराष्ट्र

खड्ड्यांविरोधात ते झाले अर्धनग्न!

नागपूर – महापालिकेला वारंवार निवेदने देऊनही दखल घेण्यात येत नसल्याने प्रहार संघटनेचे कार्यकर्ते अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर उतरले. खड्ड्यांमुळे लोकांना होणारा त्रास आणि अपघात संपविण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जयश्री टॉकीज परिसरात उघडे होऊन श्रमदानातून खड्डे बुजवले. येत्या दहा दिवसांत खड्डे बुजवण्यात आले नाही, तर महापालिकेतील अधिकाऱ्यांचे कपडे फाडण्याचा इशाराही या वेळी प्रहारकडून देण्यात आला.

आंदोलनापूर्वी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील खड्डय़ांमुळे झालेल्या अपघाता दगावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. गेल्या दोन वर्षांत शहरात सुमारे ३७ नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला. प्रहारने नागपूर महापालिकेला ३ ऑगस्ट २०१७ ला निवेदन देऊन ९ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवण्याचे निवेदन दिले. त्यावरही महापालिकेने काहीच केले नाही. अधिकाऱ्यांना इशारा म्हणून आज रस्त्यावर अर्धनग्न होऊन श्रमदानातून खड्डे बुजवून नागरिकांना वाहतुकीसाठी मदत करण्यात आली, परंतु येत्या दहा दिवसांत महापालिकेने खड्डे बुजविले नाहीत, तर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचेच कपडे फाडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेत्यांची मुलं केळी विकतात का? संजय राऊतांचा सोमय्यांना सवाल

Aprna

कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा – आ. प्रशांत बंब यांची मागणी  

News Desk

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा भाजपला इशारा!

News Desk