HW News Marathi
महाराष्ट्र

घरासाठी पीएफची नवी योजना

नवी दिल्ली – भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांसाठी खुशखबर आहे. आता घर बांधणे किंवा खरेदी करण्यासाठी पीएफच्या डिपॉझिटच्या रकमेच्या 90 टक्के रक्कम काढता येणार आहे.

भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य नवे घर घेण्यासाठी वा बांधण्यासाठी आपल्या पीएफ डिपाॅझिटमधून ९० टक्क्यांपर्यंतची रक्कम काढू शकतील. याशिवाय त्यांना मासिक अंशदानातून गृहकर्जाचा हप्ताही फेडू शकतील.यासाठीकेंद्र सरकारने ईपीएफ अॅक्ट १९५२ मध्ये दुरुस्ती करून त्यात ६८-बीडी हा नवीन परिच्छेद जोडला आहे. तो १२ एप्रिलला नवीन अधिसूचना जारी होण्यासोबतच लागू झाला आहे. ईपीएफओने शुक्रवारी परिपत्रकाद्वारे सर्व प्रादेशिक कार्यालयांना ही माहिती दिली. ईपीएफओच्या ४ कोटी सदस्यांना या योजनेचा फायदा घेता येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“१९ महिने काय तुम्ही झोपा काढत होता का?” चंद्रकांत पाटलांचा पलटवार!

News Desk

महाड दुर्घटना : NDRFच्या जवानांनी ६ वर्षाच्या मुलाला सुखरूप बाहेर काढले

News Desk

केंद्राने जनतेला वाऱ्यावर सोडले, राज्याने सोडू नये, वेळप्रसंगी कर्ज काढून लसीकरण करावे-नाना पटोले

News Desk