HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड-हैद्राबाद विमानसेवेचा २७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ

‘उडान’चे व्हिडीओलिंकींगद्वारे उद्घाटन उत्तम बाबळे

नांदेड :- ‘उडान’- उडे देश का आम नागरिक या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील नांदेड –हैद्राबाद विमान सेवेचा गुरूवार ,२७ एप्रिल २०१७ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ होणार असून व्हिडीओलिंकीगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी ११:१५ वाजता विमान सेवेचे दिल्ली येथे उद्घाटन करणार आहेत..

यानिमित्ताने नांदेड येथील गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राज्याच्या ग्रामविकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे तसेच कामगार, भुकंप, पुनर्वसन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यासह राज्याचे वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार डी. पी. सावंत आदी मान्यवरांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

‘उडान’मध्ये समाविष्ट नांदेड-हैद्राबाद या विमान सेवेसह, शिमला ते दिल्ली तसेच शिमला ते कडपा या विमानसेवेचाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिमला येथून प्रारंभ करण्यात येईल. या कार्यक्रमाचे व्हिडीओलिंकींगद्वारे थेट प्रक्षेपण कार्यक्रमात होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ED चं समन्स आणि खडसेंची तब्येत खालावली, आजची पत्रकार परिषदही रद्द

News Desk

तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

News Desk

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली तर चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका!

News Desk