HW News Marathi
महाराष्ट्र

पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाची अन्य पक्षांवर मात

राज्यात पंचायत समिती सभापती – उपसभापती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पहिला नंबर पटकावला असून सर्वाधिक ८६ पंचायत समित्यांमध्ये भाजपाचे सभापती निवडून आले आहेत तर ९२ ठिकाणी भाजपाचे उपसभापती निवडून आले आहेत. भाजपाच्या सहयोगी पक्ष – आघाड्यांचा विचार करता भाजपा व मित्रांच्या सभापतींची संख्या शंभरपेक्षा जास्त आहे. भाजपाने पंचायत समित्यांमधील सत्ता हस्तगत करताना अन्य पक्षांवर मात करून ग्रामीण भागातील जनाधार पक्का केल्याचे स्पष्ट होते, असे भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी बुधवारी सांगितले.

ते म्हणाले की, भाजपाला रोखण्यासाठी काही पक्षांनी हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही भाजपाने पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत पहिला क्रमांक राखला. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा सर्व विभागांमध्ये पंचायत समिती सभापतीपदी भाजपाचे कार्यकर्ते निवडून आले. राज्यात पंचवीस जिल्ह्यांपैकी एकोणीस जिल्ह्यांमध्ये भाजपाने किमान एक पंचायत समिती सभापतीपद जिंकले आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात दोन, जळगाव जिल्ह्यात दहा, वर्धा जिल्ह्यात आठपैकी आठ, चंद्रपूर जिल्ह्यात पंधरापैकी अकरा, जालना जिल्ह्यात आठपैकी चार, औरंगाबाद जिल्ह्यात नऊपैकी पाच, लातूर जिल्ह्यात दहापैकी सात, सोलापूरमध्ये तीन, कोल्हापूरमध्ये तीन तर सांगली जिल्ह्यात दहापैकी पाच पंचायत समित्यांचे सभापती भाजपाने जिंकले.

त्यांनी सांगितले, राज्यामध्ये गेल्या महिन्यात २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या होत्या व त्यांचा निकाल २३ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला होता. भाजपाने जिल्हा परिषदांमध्ये व पंचायत समित्यांमध्ये अन्य प्रमुख राजकीय पक्षांच्या तुलनेत अधिक जागा जिंकून प्रथम स्थान मिळवले होते. पंचायत समिती सदस्यांच्या एकूण २९९० जागांपैकी भाजपाने ८३१ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस (५९१), राष्ट्रवादी (६७४) आणि शिवसेना (५८१) हे अन्य पक्ष भाजपाच्या तुलनेत सदस्य संख्येच्या बाबतीत मागे पडले होते. त्याचेच प्रतिबिंब मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत पडले.

जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीतही भाजपा बाजी मारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगाव वसतीगृह महिला अत्याचार प्रकरणी विधानसभेत गदारोळ, ४ सदस्यीय चौकशी समिती केली गठीत – अनिल देशमुख

News Desk

अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

News Desk

नवाब मलिकांचा ‘त्या’ भाजप नेत्याच्या मेहुण्याबाबतचा गौप्यस्फोट

News Desk