HW News Marathi
महाराष्ट्र

पेट्रोल पंपावर होते लूट ?

– कोपरखैरणे इथं घडला प्रकार

नवी मुंबई – दुचाकीमध्ये पेट्रोल भरतांना पेट्रोल पंपावरील कर्मचारी घोटाळा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोपरखैरणे इथल्या डी मार्ट शॉपिंग सेंटर जवळील युनिव्हर्सल पेट्रोल पंप इथं हा प्रकार घडला आहे. यासंदर्भात पीडित दुचाकीस्वाराने सोशल मीडियामध्ये स्वतःचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. संबंधित दुचाकीस्वारानं या पंपावर दुचाकीमध्ये टाकीभरेपर्यंत पेट्रोल टाकण्यास सांगितले. या दुचाकीमध्ये आधीचे अर्धा लिटर पेट्रोल होते. त्यानंतर पुन्हा 165 रूपयांचे पेट्रोल टाकण्यात आले. त्यानंतर दुचाकीस्वाराला संशय आल्याने त्याने दुचाकीमध्ये भरलेलं पेट्रोल एका बाटलीत काढलं तेव्हा त्याला धक्काच बसला. बाटलीत फक्त अर्धा लिटरच पेट्रोल निघाले. याबाबत त्याने पंपावरील कर्मचा-यांकडे विचारणा केली असता त्याला प्रकरण न वाढवता पुढच्या मशीनवर टाकीभरून मोफत पेट्रोल भरून देण्याच आश्वासन देण्यात आलं. मात्र या दुचाकीस्वारानं थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पंपावरील कर्मचा-याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे , अशी माहिती संबंधित दुचाकीस्वारानं प्रसारित केलेल्या व्हिडिओत दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

swarit

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही – शरद पवार

News Desk

‘घटनेच्या 102 व्या घटना दुरुस्ती बाबत संसदेच्या चालू अधिवेशनात सर्वांनी एकमुखाने पाठिंबा द्यावा’ -भाजपा  

News Desk