HW News Marathi
महाराष्ट्र

बोईसर- महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन ऍकॅडमी -तारापूर तर्फे शालेय कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन

बोईसर- नागनाथ बाबर.

बोईसर दर वर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन ऍकॅडमी -तारापूर तर्फे विविध शालेय कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कला- क्रीडा महोत्सव 26 जानेवारी पासून ते 30 जानेवारी 2017 या कालावधीत बोईसर येथे संपन्न होणार असून या वेळी पालघर जिल्हा ग्रामीण भागातील सर्व शाळांना या महोत्सवात भाग घेता येणार आहे.

या स्पर्धेमध्ये 233 विद्यार्थी सहभागी झाले असून शालेय शिक्षणा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन ऍकॅडमी -तारापूर या संस्थे द्वारे प्रत्येक वर्षी अशा प्रकारे स्पर्धांचे आयोजन केले जाते.

या वेळी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, कार्यध्यक्ष डेरल डिमेलो, गजानन देशमुख, बोईसर ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली बाबर आदी उपस्थित होते.

ह्या महोत्सवात बोईसर मधील स.दा. वर्तक विद्यालय, सी.बी.संखे विद्यालय, सेवाश्रम विद्यालय व तारापूर विद्यामंदीर आदी शाळांतील विध्यार्थ्यान सह पालघर तालुका डहाणू तालुका व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.⁠⁠⁠⁠

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवनिर्वाचित आमदारांना राष्ट्रपती राजवटीची धमकी, राऊतांचा भाजपवर आरोप

News Desk

“पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी मुंबई महापालिका जिंका” – चंद्रकांत पाटील

News Desk

‘…तर अधिवेशन बोलवा, मुख्यमंत्र्यांचं जशास तसं उत्तर’, मोदी-शाहांकडे बोट!

News Desk