HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप आमदाराने घेतले नियम डावलून व्हीआयपी दर्शन

 

आमदार सुजितसिंह ठाकुर डावीकडे (संग्रहित फोटो) आमदार सुजितसिंह ठाकुर डावीकडे (संग्रहित फोटो)

तुळजापूर – लोकप्रतिनिधींच्या व्हीआयपी सुविधांवर केंद्र सरकारकडून नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचेच लोकप्रतिनिधी व्हीआयपी सुविधा घेत असल्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथे घडला आहे. भाजपचे विधान परिषदेतील आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी रविवारी सर्व नियम मोडून कार्यकर्त्यांसोबत व्हीआयपी दर्शन घेतले.

भाजपचे आमदार ठाकूर यांनी रविवारी मंदिर देवस्थानचे नियम डावलून सुमारे ६० कार्यकर्त्यांबरोबर श्री तुळजाभवानी देवीचे ‘व्हीआयपी’ दर्शन घेतले. त्यामुळे बराच वेळ ताटकळत बसावे लागणाऱ्या इतर भाविकांनी मात्र संताप व्यक्त केला. भाजप आमदार ठाकूर रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कार्यकर्त्यांसह तुळजाभवानी मंदिरात दाखल झाले. ठाकूर आणि त्यांच्यासमवेत आलेल्या कार्यकर्त्यांनी मंदिराचे नियम डावलून मंदिरात घुसून दर्शन घेतले. यामुळे जवळपास अर्धा तास रांगेत उभारलेल्या हजारो भाविकांना ताटकळत उभे राहावे लागले.

मंदिर संस्थानच्या नियमानुसार अभिषेक पूजेदरम्यान व्हीआयपी दर्शन बंद असते. तसेच रविवारी, मंगळवारी शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवले आहे, असे असतांना ठाकूर यांनी मंदिराचे नियम डावलून मंदिरात घुसून दर्शन घेतले. जर आमदार ठाकूर यांनी नियम डावलून व्हीआयपी दर्शन घेतले असेल तर माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार तथा व्यवस्थापक मंदिर संस्थान सुजित नरहरे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आतातरी केंद्राने हट्टीपणा सोडत चुका मान्य कराव्यात”, राष्ट्रवादीचा कृषी कायद्यावरुन सल्ला

News Desk

राज्यात काल 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk

“ST च विलीनीकरण होणे शक्य नाही, आणि ही बाब विरोधी पक्षालाही माहीती”- शिवसेना

News Desk