HW News Marathi
महाराष्ट्र

मनपा निवडणुक मनसेसाठी प्रतिष्ठेची

( गौतम वाघ )

उल्हासनगर – उल्हासनगर शहरातील मनसेसाठी मनपा निवडणुक प्रतिष्ठेची ठरणार आहे. मनसे आपले अस्तित्व टिकवुन ठेवणार का गटबाजीमुळे मननसेला ग्रहण लागणार हे लवकरच ठरणार आहे.मनसेचे एकमेव नगरसेवक भाजपाच्या तंबुत दाखल झाले आहेत.

2007 ला महानगरपालिकेच्या झालेल्या सार्वञीक निवडणुकीत राज ठाकरेचा मनसे इंजीन चालत प्रथमच नरेंन्द्र दवणे व जयश्री पाटील यांनी प्रथम मनपा सभागृहात प्रवेश केला दोनही नगरसेवकांनी त्यांच्या मताने काम केले. परंतु 2012 साली झालेल्या निवडणुकीत पक्षाचा एकच नगरसेवक निवडून आला तेव्हापासून मनसेला अंतर्गत राजकारणाला फटका बसला.त्यातच उल्हासनगर पूर्व व पश्चिम असे दोन शहराध्यक्ष देऊन उल्हासनगर १,२,३ विभागासाठी संजय घुगे तर उल्हासनगर ४,५ विभागासाठी प्रदीप गोडसे यांची शहराध्यक्षपदी वर्णी लागली ती सुध्दा जंबो कार्यकारिणी घेऊन प्रत्येक पदाधिकारी आपल्या वरिष्ठांना डावलुन गटातटाचे राजकारण करू लागले. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहराचे काम करतील असे नागरीकांना वाटत होते पण हाताच्या बोटावर मोजन्याइतकेच कार्यकर्ते काम करतांना पहावयास मिळत होते.या सर्वाचे लक्ष वेधण्यासारखे काम केले ते महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष लोकसभाध्यक्ष बंडू देशमुख व उल्हासनगर मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी पक्षाची अस्मीता जपत उल्हासनगर महानगरपालिकेत सत्ताधारी पक्षाला धारेवर आणत भव्य अशी डाँ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका,मनपा शाळेतील चिक्की घोटाळा,रस्ते,विद्यार्थी यांसाठी खेळाची मैदान,मुलांची शिष्यवृत्ती आदी कामे मनविसेच्या माध्यमातून करुन मनपामध्ये विरोधी पक्षाच्या भुमीकेत राष्ट्रवादी काँग्रेसने जी भुमीका घ्यायला पाहिजे होती ती भुमीका मनविसेने काहिही नसतांना पार पाडुन दाखवली आहे.

तर दुसरीकडे मनसेचे एकमेव असणारे नगरसेवक नरेंन्द्र दवणे हे भाजपाच्या वाटेवर गेल्याने मनसेचे खरे अस्तित्व फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीत सिद्ध होणार आहे.मनसेची खरी कसोटी लागणार असुन सद्या मनसेत फेरबदल केल्यास बंडु देशमुख वा मनोज शेलार यांच्यावर जबाबदारी दिल्यास मनसेची होणारी नाचक्की होणार नाही असे मनसैनिक बोलत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधान झालेलेही पाहायला आवडेल !

News Desk

जन्मदात्याचाच अल्पवयीनेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

News Desk

पश्चिम बंगालमध्ये लोकशाही पायदळी !

News Desk