HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा मागासवर्गीय आयोगाकडे

  • 27 एप्रिलला पुढील सुनावणी

मुंबई – मराठा आरक्षण मुद्दा मागासवर्गीय आयोगाकडे सोपवण्यास आपली हरकत नसल्याचे राज्य सरकारने कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

मराठा आरक्षण मुद्दयांवर मुंबई हायकोर्टात सुरु असलेल्या मुळ याचिकेवरील सुनावणी दरम्यान इतर याचिका आल्याने कोर्टाने मराठा आरक्षण हा मुद्दा कोर्टात चालवायचा की, मागासवर्गीय आयोगाकडे सोपवावा असा एक मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानुसार मुबंई हायकोर्टाने सर्व याचिकाकर्त्यांना त्यांचे म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता मराठा आरक्षण याचिकेवर याच महिन्यातील म्हणजे एप्रिल 27 तारखेला होणार्‍या सुनावणीच्या वेळेस मुंबई हायकोर्ट काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपुरात मुस्लीम बांधवांनी आज कुर्बानीशिवाय केली बकरी ईद साजरी

News Desk

कंगना राणावत प्रकरणात राज्यापालांचा हस्तक्षेप, मुख्यमंत्र्यांबद्दल व्यक्त केली नाराजी

News Desk

कोळसा आयातीचा केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला भाजपच्या मित्रांच्या फायद्यासाठी! – नाना पटोले

News Desk