HW News Marathi
महाराष्ट्र

माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन

पाथर्डी / तिसगाव (अहमदनगर) : शनिवारी रात्री लोकनेते माजी आमदार राजीव राजळे (वय ४८) यांचे मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यामुळे पाथर्डी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव कासार पिंपळ्गाव येथे सिद्धसावली या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

राजळे हे काही दिवसांपासून न्युमोनियामुळे आजारी होते़ नगर येथे उपचार सुरु असतानाच त्यांच्या फुप्फुसात संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील माजी आमदार अप्पासाहेब राजळे, आई मोहिनी राजळे, पत्नी आमदार मोनिका राजळे, दोन मुले व एक बंधू राहूल असा परिवार आहे.

रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव कासार पिंपळगाव येथे आणण्यात आले. रुग्णवाहिकेसोबत राजीव राजळे यांच्या पत्नी तथा आमदार मोनिका राजळे, राजाभाऊच्या भगिनी सुनीता गडाख, संगीता जगदाळे, राहुल राजळे, गुलाब राजळे हे होते. पार्थिव असलेली रुग्णवाहिका प्रवेशद्वारात येताच राजीव राजळे यांच्या आई मोहिनीकाकी यांचा बांध फुटला. त्यांच्यासह सर्वच नातेवाईकांना अश्रू अनावर झाले़ त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जिल्हाभरातील त्यांचे कार्यकर्ते कासार पिंपळगाव येथे दाखल झाले आहेत. अंत्यविधीची तयारी जवळच असलेल्या दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु आहे. राज्य शासनातील मंत्री, अधिकारी यांची उपस्थिती गृहीत धरून मोठा शामियाना, हेलिपॅड, वाहन पार्किंग व पूरक व्यवस्था उभारण्याचे काम सुरु आहे़ ४़३० वाजता अंत्यविधी होणार आहे. दरम्यान पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावे आज बंद आहेत. लाडक्या नेत्याच्या शोकसागरात बुडालेल्या अनेक शेतक-यांनी आज दूधही डेअरीवर नेले नाही़ काही डेअरी संचालकांनी संकलन बंद ठेवले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नोकरशहा महाविकसआघाडीत भांडणे लावत आहेत | अशोक चव्हाण

News Desk

एकनाथ शिंदे यांच्या बॉडीगार्डने केली मारहाण

News Desk

इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

News Desk