HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत भाजप सेनेच्या पाठिशी : मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईत महापौरपदाची निवडणूक भाजप लढणार नाही, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मुंबईत महापौरपदासोबतच उपमहौपर, स्थायी समिती अध्यक्ष, बेस्ट समितीची निवडणूकही भाजप लढणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबई महापालिकेत भाजप विरोधी पक्षाची भूमिकेत राहणार नाही, तर पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भूमिका भाजप निभावले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईच्या हितासाठी निर्णय घेतला असून, गरज पडल्यास शिवसेनेला मदत करु. मात्र, शिवसेना सोडून इतर कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भाजप मुंबईत यातील कोणतीही निवडणूक लढवणार नाही!

•महापौर

•उपमहापौर

•स्थायी समिती

•बेस्ट समिती

•प्रभाग समिती

शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया :

“मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक भाजप लढवत नाही, ही आनंदाची बाब आहे. मुंबईकरांचा कौल भाजपने स्वीकारल्याचा आनंदच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि उद्धव ठाकरेंचंही अभिनंदन करतो.”, असे शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

LIVE UPDATES :

मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई महापौरपदाची निवडणूक भाजप लढणार नाही – मुख्यमंत्री

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष – मुख्यमंत्री

जनतेने भाजपवर मोठा विश्वास दाखवला आहे – मुख्यमंत्री

आठ महापालिकांमध्ये भाजपला थेट बहुमत – मुख्यमंत्री

महानगरपालिकांमध्ये भाजपला अभूतपूर्व यश – मुख्यमंत्री

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही, राजकारणाचा चिखल कुणी एकमेकांवर उडवू नये –  मुख्यमंत्री

News Desk

राज्यात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk

सुशांतसिंग प्रकरणाचा तपास डॉ नरेंद्र दाभोळकरांसारखा होऊ नये, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

News Desk