HW News Marathi
महाराष्ट्र

स्वारातीम विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. रमजान मुलानी

उत्तम बाबळे

नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी विद्यापीठ परिसरातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील प्रा.डॉ.आर.एम. मुलानी यांची नियुक्ती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केली. त्यांनी आज बुधवार, दि.२९ मार्च रोजी विद्यापीठाचे मावळते कुलसचिव बी.बी.पाटील यांच्याकडुन कुलसचिवपदाचा पदभार स्विकारला.

जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये उपकुलसचिवपदी कार्यरत असलेले बी.बी.पाटील यांनी दि.०८ मे, २०१३ रोजी विदयापीठाच्या कुलसचिवपदाचा पदभार स्विकारला होता. जवळपास चार वर्षे त्यांनी कुलसचिवपदाचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार लवकरच महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निवडणूकांसाठी बी.बी.पाटील यांना माघारी बोलावण्यात आल्यामुळे ते त्यांच्या पूर्वपदावर रुजू होत आहेत. अचानकपणे रिक्त झालेल्या या पदावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठ परिसरातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील प्रा.डॉ.आर.एम. मुलानी यांची नियुक्ती केली.

डॉ.आर.एम. मुलानी यांना विद्यापीठाच्या वेगवेगळ्या समित्यांवर काम करण्याचा अनुभव असून सद्या त्यांच्याकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या समन्वयक पदाचा कार्यभार आहे.

यावेळी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ.आर.एम. मुलानी यांचे सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरक्षणात बदल होणार नाही | तावडे

News Desk

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

News Desk

“…तोपर्यंत आम्ही विश्वास कसा ठेवणार?”; ST बाबत चर्चेच्या निमंत्रणानंतर पडळकरांचा सवाल

News Desk