HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपला १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा

मुंबई | राज्यात विधानसभा निवणुकीचा निकाल जाहीर झाले आहेत. या निकालात शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवला. तर भाजपचे १०५ उमेदवार यशस्वी ठरले आहेत. महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्यासाठी विधानसभेत १४५ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. राज्यात सध्या राज्यात मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेना रस्सीखेच सुरू आहे. भाजपला आतापर्यंत १० अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेला यासाठी शिवसेना-भाजप यांनी संख्याबळ वाढविण्यासाठी अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ओढाताण सुरू आहे.

नुकतेच गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अग्रवाल यांनी भाजपला पाठिंबा देत असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले आहे. तसेच आमदार महेश बालदी यांनीदेखील भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. रायगडमधील उरण विधानसभेतील अपक्ष आमदार महेश बालदी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत, पाठिंबा जाहीर केला. या दोन अपक्षांनी आज (२९ ऑक्टोबर) भाजपला पाठिंबा दर्शवला.

शिवसेनेकडे आतापर्यंत ५ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६० वर पोहोचले आहे. तर दुसरीकडे भाजपलाही १० अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचे संख्याबळ १०५ वरुन ११५ जागांवर येवून पोहोचले आहे. भाजपला सोमवारी (२८ ऑक्टोबर) बडनेराचे आमदार आमदार रवी राणा, मीरा-भाईंदरच्या बंडखोर आमदार गीता जैन, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पाठिंबा दर्शवला. आता २ अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने भाजपचे संख्याबळ ११५ इतके झाले आहे.

भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार

  • महेश बालदी – उरण
  • विनोद अग्रवाल- गोंदिया
  • गीता जैन- मीरा भाईंदर
  • किशोर जोरगेवार – चंद्रपूर
  • रवी राणा- बडनेरा, अमरावती
  • राजेंद्र राऊत – बार्शी
  • श्यामसुंदर शिंदे – लोहा, नांदेड
  • रत्नाकर गुट्टे – गंगाखेड, परभणी
  • विनोद अग्रवाल – गोंदिया
  • महेश बालदी – उरण

शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार

  • रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल
  • प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू
  • प्रहार संघटनेचे आमदार राजकुमार पटेल
  • भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर
  • नेवासा अपक्ष आमदार शंकरराव गडाख

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे, यशोमती ठाकूर हरवल्या, शोधणाऱ्यास ५०० रुपये बक्षिस देऊ” भूमाता ब्रिगेडचा स्टंट

News Desk

‘राजू शेट्टींबाबत राज्यपाल निर्णय घेतील’, शरद पवारांचं वक्तव्य!

News Desk

यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात न होता ‘या’ ठिकाणी होणार…

News Desk