HW News Marathi
महाराष्ट्र

१० लाख मराठा उतरणार मुंबईच्या रस्त्यांवर!

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ऑगस्ट क्रांती दिनी अर्थात ९ ऑगस्ट रोजी राज्यभरातील मराठा बांधव मुंबईतील रस्त्यांवर उतरणार आहेत. राज्यभरात या महामोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. गावोगावी या मोर्चाचा प्रचार करण्यात येत असून, त्यासाठी मुंबईसह राज्यभरात बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, आतापर्यंत सुमारे दहा लाख मराठ्यांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी नोंदणी केल्याची माहिती आहे.

या मोर्चामुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘मुंबई- पुणे एक्‍स्प्रेस वे’वर मोर्चाची वाहने एका लेनवरच ठेवण्याची सूचना समन्वय समितीकडून देण्यात आली आहे. मात्र मुंबईत चेंबूर ते डॉकयार्ड दरम्यानची संपूर्ण मार्गिका मोर्चकऱ्यांच्या वाहनांनी व्यापण्याची शक्‍यता आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या मार्गावरून महामोर्चा जाणार असून दोन हजार मराठा स्वयंसेवक मोर्चाचे नियंत्रण करणार आहेत.

दरम्यान, मुंबईत बीपीटी सिमेंट यार्ड व वडाळा ट्रक टर्मिनल या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोर्चात प्रचंड संख्येने मराठा समाज सहभागी होणार असल्याने दक्षिण मुंबईत सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक यंत्रणेवर मोठा ताण पडण्याची शक्‍यता आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने मोर्चासाठी आवश्‍यक सेवा पुरवण्याची तयारी दर्शविली आहे. तर, पोलिस प्रशासनाच्या वतीने उद्या सायंकाळपर्यंत मोर्चाच्या नियोजनाची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल, असे समन्वय समितीकडून कळवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील जनतेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून हवे होते – जे.पी.नड्डा

News Desk

पूजा चव्हाण प्रकरणावर धर्मगुरुंच्या साक्षीने अखेर संजय राठोड बोलणार ?

News Desk

‘तिरंदाजीत भारताला पहिलं पदक!’

News Desk