HW News Marathi
महाराष्ट्र

‘अमरावतीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू!’

अमरावती | अमरावतीच्या वर्धा नदीत एक भयानक दुर्घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र झुंज येथे एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोट उलटल्याने वर्धा नदीपात्रात 11 जण बुडाल्याची माहिती आहे. तिघा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतरांचा शोध सुरु आहे. एकाच परिवरातील 11 जण दशक्रिया विधीसाठी आले होते. काल दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आज फिरायला गेले असता ही दुर्घटना घडली. नाव उलटून तिघा जणांना जलसमाधी मिळाली, तर आठ जणांचा शोध सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

एकाच कुटुंबातले 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रिया विधीसाठी आले होते. सोमवारी संध्याकाळी दशक्रिया विधी झाला. त्यानंतर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वरूडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून होडीने जात होते. मात्र होडी उलटली आणि 11 जणांना जलसमाधी मिळाली आहे.

अमरावती आणि नागपूरच्या मधोमध वर्धा नदी आहे. याच ठिकाणी झुंज नावाचं एक मोठं तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी अनेक भाविक भक्त येतात. तसेच आजही 11 जण नावेतून जात होते. मात्र त्याचवेळी ही दुर्घटना घडली. 11 जणांना या घटनेत जलसमाधी मिळाली. आमचं बचावकार्य या भागात सुरू आहे. महसूल विभाग, पोलीस यांची पथकं, बचाव पथकं अशी सगळी दाखल झाली आहेत. मात्र दुर्घटनेतल्या कुणालाही वाचवता आलेलंन नाही. मोर्शी विधानसभा क्षेत्राचे आमदार देवेंद्र भुयार यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहचले. आतापर्यंत चौघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

News Desk

महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट व्हावं – शरद पवार

News Desk

काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब

News Desk