HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर प्रीतम मुंडे नाराज समर्थकांच्या भेटीला

मुंबई | केंद्रिय मंत्रीमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना जागा न मिळाल्याने मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली. महाराष्ट्रातील मुंडे समर्थकांनी, पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. या सगळ्यांची भेट आज (१३ जुलै) भाजप नेत्या पंकजा मुंडे या घेत आहेत. मुंबईत वरळीच्या कार्यालयात संपुर्ण महाराष्ट्रातून समर्थकांचा सागर आला आहे.

दरम्यान, मंत्री मंडळाचा विस्तार झाल्यानंतर खासदार प्रीतम मुंडे या गायब झाल्या होत्या. त्यांनी नवनिर्वाचीत मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. मात्र, आज खासदार प्रीतम मुंडे समर्थकांच्या भेटीसाठी मुंबईत आल्या आहेत. पंकजा मुंडे देखील आहेत. पदाधिकाऱ्यांशी बातचीत केल्यानंतर पंकजा आणि प्रीतम मुंडे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे आमदार बहुदा राष्ट्रवादीमूळे निवडून आले, शरद पवारांच्या उत्तराला दरेकरांचे प्रत्युत्तर

News Desk

‘एमपीएससीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा’-आदित्य ठाकरे

News Desk

‘त्या’ महिलेला सचिन वाझे दरमहा 50 हजार रुपये द्यायचे!

News Desk