HW News Marathi
महाराष्ट्र

‘छगन भुजबळांनी इम्पेरिकल डेटासाठी पुढाकार घ्यावा,’ आम्ही पाठिंबा देऊ भाजपा!

मुंबई। ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल या दोन्ही आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ मागील काही दिवसांपासून होतांना दिसते, याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आज राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ हे इम्पेरिकल डेटासंदर्भात चर्चा करण्यासाठी आले होते असं सांगत फडणवीस यांनी इम्पेरिकल डेटासाठी भुजबळांनी पुढाकार घ्यावा, आम्ही पाठिंबा देऊ, असं असं म्हणत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“छगन भुजबळ आज मला भेटायला आले होते. ओबीसी राजकीय आरक्षण हाच त्यासंदर्भातला विषय होता. इम्पेरिकल डेटा कसा गोळा करता येईल यासंदर्भात तुमचं काय मत आहे, हे ऐकूण घेण्यासाठी आलो आहे, असं त्यांनी मला सांगितलं. अस फडणवीस म्हणाले मी त्यांना हे सांगितलं की मराठा आरक्षणाच्यावेळी आम्ही आमचं सरकार असताना कसा इम्पेरिकल डेटा जमा केला आणि तो सर्वोच्च न्यायालयाने कसा वैध ठरवलेला आहे. आताही तो कसा करता येईल हे सांगितलं. हे देखील सांगितलं की त्यांनी पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्यात आणि त्याला आम्ही पूर्ण मदत करु. मी स्वत: वैयक्तिकरित्या मला जे काही वाटतं त्यासंदर्भात नोड देखील तयार करुन द्यायला तयार आहे. आपण एकत्रितपणे काम करु मला काही अडचण नाही आहे, तुमच्यासोबत काम करु, कारण सत्तारुढ पक्षाला नेतृत्व करावं लागतं आम्ही पूर्णपणे त्यामध्ये मदत करु,” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

भुजबळ फडणवीस भेट-

छगन भुजबळ यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळही उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं, अशी खुली ऑफर देत फडणवीसांनी केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा, असं छगन भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर आज मंत्री छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चुकीचं काहीही केलं नाही, सोमय्या केवळ बदनामी करताहेत; अनिल परब यांचा दावा!

News Desk

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर सूनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

swarit

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

News Desk