HW News Marathi
महाराष्ट्र

महाडमध्ये मोठी दुर्घटना, तळई गावात दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू…!

महाड। महाडमध्ये मुसळधार पावसात मोठी दुर्घटना घडली आहे. तळई गावावर दरड कोसळली आहे. तब्बल 35 घरांवर ही दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे बचावपथक दाखल झाले असून बचाव आणि शोधमोहिम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.गेल्या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चक्क 10 ते 15 फूट रस्त्यांवर आणि वस्त्यांत पाणी शिरल्याचं पहायला मिळालं. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीला ढगफूटी सदृश्य अतीमुसळधार पावसाने, महापूर परीस्थिती निर्माण केलीय. सावित्री नदीला आलेल्या महापूरामुळे महाड शहर पुर्णपणे पाण्याखाली गेलं आहे.

कशी घडली ही दुर्घटना?

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

सरकार भावनाशून्य झालंय

एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासन संवेदनशील नाही. सरकार भावनाशून्य झालंय. शासनाच्या ही अशी निगरगट्ट यंत्रणा मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आपला संताप व्यक्त केला. माझी शासनाकडे विनंती आहे की या घटनेकडे गांभीर्याने बघून त्वरित मदत कार्य सुरू करा, अशी मागणी दरेकर यांनी केली.ही घटना मोठी आणि दुर्दैवी असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून हेलिकॉप्टर मागवावे, असंही प्रवीण दरेकर म्हणाले

एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : आजपासून पुण्यात तीन दिवस बाजारपेठा बंद, तर घरोघरी जाऊन करणार सर्वेक्षण

swarit

इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत त्वरीत नोंदणी सूट मर्यादेस मुदतवाढ

Aprna

भाजपला सलग दुसरा धक्का ! हेमेंद्र मेहतांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

News Desk