HW Marathi
महाराष्ट्र

19 पैकी नऊ आमदारांचे निलंबन मागे

मुंबई  कर्जमाफीसाठी गोंधळ घालणे तसेच अर्थसंकल्पाच्या प्रति जाळणे आदी प्रकरामुळे निलंबन करण्यात आलेल्या 19 पैकी 9 आमदारांचे निलंबन शनिवारी मागे घेण्यात आले. दीपक चव्हाण, संग्राम थोपटे, नरहरी झिरवळ, दत्तात्रय भरणे, अब्दुल सत्तार, डी. पी. सावंत, वैभव पिचड, अवधूत तटकरे, अमित झनक या आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून गदारोळ घातला होता. सभागृहात बॅनर फडकाविणे, टाळ  कुटत अर्थमंत्र्यांच्या भाषणात अडथळा निर्माण करणे तसेच विधानभवनाच्या परिसरात अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्याचे आरोप या सर्व आमदारांवर होते. त्यामुळे गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत राज्य सरकारने 22 मार्च रोजी 19 आमदारांना निलंबित केले होते. या कारवाईविरोधात विरोधकांनी आंदोलन केले होते. निलंबन मागे घेतल्याशिवाय विधानसभेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर सरकारने सकारात्मक पाऊल उचलत 9 जणांचे निलंबन मागेतले आहे.

Related posts

महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

News Desk

रस्त्यांच्या माध्यमातून विकास वेगाने पूर्णत्वाला | एकनाथ शिंदे

News Desk

ग्रामीण मुलींना मिळणार 12 वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास

News Desk