HW News Marathi
महाराष्ट्र

चिपळूणच्या भीषण पूरस्थिती नियंत्रणाच्या रेस्क्यूसाठी 2 हेलिकॉप्टर रवाना!

रत्नागिरी। रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर झालेला धुवांधार पाऊस आणि त्यासोबत झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण शहर जलमय झालं आहे. मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली असून वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर पाण्याखाली गेलं आहे. 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर आल्याचं दिसून येत आहे. बाजारपेठ, खेर्डीमध्ये सात फुटांपेक्षा जास्त पाणी शिरलंय. अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय.मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झालीय. तर चिपळूण शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

अनेक घरांमध्ये, छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत. चिपळूणमधील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत.रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस आणि कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आलेय. वशिष्ठी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. पाणी वाढण्याचा वेग मोठा आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड, भोगाळे, परशूराम नगर याबरोबरच खेड परिसरात पाणी वाढत आहे. रॉयल नगर तसंच राधाकृष्ण नगरमधील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या चारचाकी आणि दुचाकी पाण्याखाली आहेत.

बचावकार्यासाठी स्थानिक चिपळूण नगरपालिकेने 2 बोटीद्वारे रेस्क्यू

हायटाईड आणि अतिवृष्टी वेळ एकत्र आल्यामुळे खेड आणि चिपळूणमध्ये गंभीर परिस्थिती आहे असं जिल्हा प्रशासनकडून सांगण्यात आलं आहे. बचावकार्यासाठी स्थानिक चिपळूण नगरपालिकेने 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं आहे. तर रत्नागिरी मधून 1, पोलीस विभागाकडील 1 आणि कोस्टगार्डची 1 बोट अश्या 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आलंय

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जगबुडी नदीला पूर आलाय. नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आलंय. प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. नदीच्या पात्राचं पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये शिरलंय. आजूबाजूच्या शेतांमध्येही पाणी शिरलंय.

तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी पाचारण

पुणे हुन NDRF च्या दोन टीम पुणे (खेड साठी 1 आणि चिपळूण साठी 1) इथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. रेस्क्यू आँपरेशनसाठी 2 हेलिकाँपटर चिपळूण कडे रवाना झाले आहेत. NDRF ची टीमही काही वेळातच पोहचणार आहे. याशिवाय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी प्राशकीय मदत पथकं चिपळूणकडे रवाना झाली आहेत.

अनेक नद्या धोका पातळीवरुन वाहतात

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर असून सध्या ती 9 मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी 7 मीटर असून ती 7.8 मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या 1.74 मीटर वरून वाहत आहे. यामुळे कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे आणि परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे, तसेच इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे.

प्रशासकीय यंत्रणांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना

भातसा धरण परिसरात गेल्या 24 तासांत 336 मिमी पाऊस झाला असून धरण 63 टक्के भरले आहे. तर सूर्या धरण परिसरात 156 मिमी पाऊस झाला असून ते देखील 63 टक्के भरले आहे.बारावी परिसरात देखील 256 मिमी पाऊस झाला. त्यामुळे धरण 62 टक्के तर मोरबे धरणही 260 मिमी पाऊस झाल्याने 71 टक्के भरले आहे. या धरणांचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासकीय यंत्रणांना देखील तसे सांगण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रक्रियेसाठी बृहत आराखडा निश्चित करावा! – संजय राठोड

Aprna

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांचे निधन

News Desk

Koregaon Bhima Violence | पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची वाढ

Gauri Tilekar