HW News Marathi
देश / विदेश

#NirbhayaCase : आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळली, दोषींना फाशी अटळ

नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायलायने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह दोन्ही आरोपींनी क्युरेटीव्ही पेटीशन म्हणजे पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने चारही आरोपींना २२ जानेवारीला सकाळी सात वाजता फासावर लटकविले जाणार आहे.

गेल्याच आठवड्यात दोषी अक्षय ठाकूर (३१), पवन गुप्ता (२५), मुकेश सिंह (३२) आणि विनय शर्मा (२६) यांचे डेथ वॉरंट जारी केले होते. यानंतर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह या दोन्ही आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या दोन्ही आरोपींच्या पुनर्विचार याचिकेवर आज (१४ जानेवारी) न्यायालयात न्या. एन. व्ही. रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, आर. एफ. नरीमन, आर. भानुमती, न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने एकमताने आरोपींची याचिका फेटाळून लावली.

तिहार तुरुंगातील फाशीची रंगीत तालीम

निर्भयाच्या चारही आरोपींना तिहार तुरुंगात चौघांच्या फाशीची तयारी पूर्ण झाली आहे. या चारीह आरोपींच्या डमींना रविवारी (१२ जानेवारी) फाशी देऊन रंगीत तालीम करण्यात आली होती. प्रत्येक दोषीच्या वजनाइतकी दगड-मातीने भरलेली पोती फासावर लटकवून तयारी करण्यात आली. पोत्याला गळफास लावून दोरीची चाचणी करण्यात आली आहे. जल्लादाला न बोलावता तुरुंगातील अधिकाऱ्यांनीच फाशीची प्रक्रिया पूर्ण केली होती.

१६ डिसेंबरची ती काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरु झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. तसेच तिला अमानुष मारहाणही केली. त्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना व्हायरसशी लढण्यास भारत सज्ज

swarit

बूम बूम फेस्टिव्हलला सुरुवात

News Desk

‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी वागणूक केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळतेय!

News Desk